पश्चिम महाराष्ट्र

श्रीपाद छिंदम शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याने सर्व मतदारांचेही आभार मानले.

यावेळी, शिवाजी महाराजांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महामानवांसमोरही तो नतमस्तक झाला आणि त्यांना अभिवादन केले. महापालिका निवडणुकानंतर श्रीपाद छिंदम हा पहिल्यांदाच नगर शहरात आला होता. त्यावेळी, तो बोलत होता. या महामानवांच्या आशिर्वादानेच आपल्याला महापालिकेत विजय मिळाला असल्याचे मतही त्याने व्यक्त केले.

दरम्यान, शिवाजी महाराज यांच्याविषयी अलीकडेच अपशब्द उच्चारल्यामुळे छिंदम मोठ्या वादात सापडला होता. परंतु, नगर महापालिकेच्या निवडणुकीत तो विजयी झाला. प्रभाग क्रं. 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT