malnutrition 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील कुपोषित बालकांची संख्या...किती ते नक्‍की वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभागाच्या सर्व्हेनुसार राज्यातील 78 हजार 989 बालके कुपोषित असून तब्बल पाच लाख 21 हजार 183 बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अतितीव्र कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आता अंगणवाडी स्तरावर नव्याने सुमारे दोन हजार 700 बालविकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कुपोषित बालकांच्या फेरपडताळणीचे निर्देश देण्यात आले आहेत. 


अतितीव्र कुपोषित बालकांना बाल विकास केंद्राच्या माध्यमातून दिवसातून सहावेळा पोषण आहार दिला जातो. तरीही राज्यातील ग्रामीण भागात 40 हजार 383 कुपोषित बालके असून दोन लाख 47 हजार 576 बालके कुपोषणाच्या उबंरठ्यावर आहेत. आदिवासी भागात 30 हजार 555 बालके कुपोषित असून एक लाख 33 हजार 312 बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. तर नागरी भागातही कुपोषण वाढू लागले असून आठ हजार 51 बालके कुपोषित झाली आहेत. शहरी भागातील एक लाख 40 हजार 295 बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर असल्याचे समोर आले आहे. 2018-19 मध्ये राज्यातील नऊ हजार 336 ग्राम बालविकास केंद्रांत 14 हजार 802 कुपोषित बालकांना दाखल करण्यात आले. तर 2018-19 मध्ये 10 हजार 477 बालकांना या केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुपोषित मुलांच्या तुलनेत राज्यात बालविकास केंद्रांची संख्या अपुरी असल्याने आता अंगणवाडी स्तरावर बालविकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पोषण संसाधन केंद्रेही (एनआरसी) वाढविली जाणार आहेत. 

दिवसातून सहावेळा पोषण आहार
अंगणवाडी सेविकांमार्फत कुपोषित बालकांचा सर्व्हे केला असून आता आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाकडून फेरपडताळणी करण्याचे निर्देश राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार गरजेच्या ठिकाणी कुपोषित बालकांच्या सोयीसाठी नव्याने ग्राम बालविकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत. त्यातून त्यांना दिवसातून सहावेळा पोषण आहार दिला जाणार असून पोषण संसाधन केंद्रातून उपचारही केले जाणार आहेत. 
- जामसिंग गिरासे, उपायुक्‍त, एकात्मिक बालविकास विभाग 


राज्यातील कुपोषणाची स्थिती 
कुपोषित बालके 
78,989 
कुपोषणाच्या उंबरठ्यावरील बालके 
5,21,183 
बाल विकास केंद्रे 
9,336 
प्रस्तावित केंद्रे 
2,700 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT