पश्चिम महाराष्ट्र

उद्योजकच तयार करणार कुशल मनुष्यबळ

संतोष भिसे

सांगली - जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रापुढे  कुशल मनुष्यबळाची चणचण ही सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे. विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण संपताच पुण्याकडे धावतात. त्यामुळे उद्योगांना कुशल कामगार मिळत नाहीत.

उद्योजकांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. मिरज-कुपवाडदरम्यान स्वतःचे औद्योगिक  प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) सुरू केले जाणार आहे. तेथे प्रशिक्षित तरुणांना उद्योगात संधी देऊन कुशल मनुष्यबळाची गरज भागवली जाईल. 

मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्‍चुरर्स असोसिएशनच्या पुढाकाराने केंद्र साकारत आहे. अध्यक्ष संजय आराणके म्हणाले,‘‘उद्योगांना सर्वाधिक गरज भासणारे सहा अभ्यासक्रम चालवले जातील. टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनीस्ट, सीएनसी ऑपरेटर आणि मेकॅनिकल ड्राफ्टस्‌मन यांचा समावेश आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वीसप्रमाणे एकूण १२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. दहावी आणि बारावी उत्तीर्ण प्रवेशपात्रता असेल. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात पहिले वर्ष प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेचे असेल. दुसऱ्या वर्षी प्रत्यक्ष कारखान्यात काम दिले जाईल. कारखान्यांच्या गरजेनुसार त्यांना प्रशिक्षित केले जाईल. विद्यार्थीदशेतच यंत्रांवर कामाची संधी मिळाल्याने ते कुशल होतील. कामाचे वेतनही मिळेल. प्रशिक्षणानंतर कोठेही काम करू शकतील.  अभ्यासक्रम, प्रवेशशुल्क, शिक्षक नियुक्‍त्या, परीक्षा आणि अन्य बाबी शासनाच्या  नियमानुसार असतील. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र मिळेल. शासनाच्या औद्योगिक क्‍लस्टर योजनेतून आयटीआय साकारते आहे. सांगली-मिरज-कुपवाड औद्योगिक वसाहतींसह जिल्हाभरातील उद्योगांची मनुष्यबळाची गरज हे प्रशिक्षण केंद्र भागवेल. कोल्हापुरात शिरोली वसाहतीतील उद्योजक अनेक वर्षांपासून स्वतःचे आयटीआय चालवत आहेत; त्यातून निष्णात मनुष्यबळ मिळत आहे. तोच पॅटर्न सांगली-मिरजेतही राबवू.

सांगली-मिरजेतील वसाहतीत अनेक कारखान्यांपुढे  कुशल कामगार हवे असल्याचे फलक झळकताहेत.  सध्या काम करणारा बहुतांश कामगार परप्रांतीय व अकुशल आहे. नव्या आयटीआयमुळे ही उणीव भरून निघेल. 

‘मिळेल तशा मनुष्यबळाला प्रशिक्षित करून उद्योग चालवावे लागत आहेत. प्रशिक्षित कामगाराअभावी उद्योगवृद्धीवर परिणाम होत आहे. परदेशात उत्पादने निर्यात करणाऱ्या उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची समस्या तीव्रतेने जाणवते; नव्या आयटीआयमुळे ती दूर होईल’.
- श्री. संजय आराणके,
अध्यक्ष, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्‍चुरर्स असोसिएशन
 

एक दृष्टिक्षेप 

  •   सांगली-मिरज-कुपवाड वसाहतीतील उद्योगांची संख्या - ७८८
  •   कामगार संख्या - सुमारे ३० हजार
  •   अनुशेष - सुमारे १० हजार
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT