pramod suryavanshi.jpg
pramod suryavanshi.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महापुराच्या सानुग्रह अनुदानापासून इतके पूरग्रस्त वंचित 

सकाळवृत्तसेवा

सांगली- सांगली, मिरज शहराला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महापुराचा दणका बसला होता. त्यामुळे नागरिक, दुकानदार, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप नागरिक, दुकानदार, व्यापारी असे सुमारे सुमारे अडीच हजार पूरग्रस्तांना अनुदान मिळालेले नाही. ते तातडीने मिळावे अशी मागणी शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रमोद सुर्यवंशी यांनी केली आहे. मागणीचे निवेदन राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांना देण्यात आले. 


श्री. सुर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीस आलेल्या महापुराने शहरातील पावणे दोन लाख नागरिकांना फटका बसला. हजारो कुटुंबे, दुकानदार, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. तत्कालीन शासनाने व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र आठ महिने झाले तरी अद्याप हे अनुदान सुमारे अडीच हजारजणांना मिळालेले नाही. अनुदानाबाबत तहसील कार्यालयात सातत्याने हेलपाटे मारुनही त्यांच्या खात्यात अनुदान वर्ग झालेले नाही. महापालिका क्षेत्रातील नुकसान भरपाईपोटी पैसे द्यायचे आहेत. मात्र सध्या निधी शिल्लक नाही. तो मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे, असे उत्तर तहसील कार्यालयातून मिळत आहे. 


सध्या कोविड 19चे संकट गहिरे झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यापार ठप्प आहे. त्यामुळे गोरगरिबांचे व्यवसाय, मजुरी ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महापुराचे सानुग्रह अनुदान मिळाल्यास या वर्गाला दिलासा मिळणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. अनुदानापासून शामरावर नगर, गावभाग, कर्नाळ रस्ता, बुरुड गल्ली, मारुती रस्ता, हरीपूर रोड, रामनगर, बुधगाव रोड या परिसरातील पूरग्रस्त अद्याप वंचित राहिले आहेत. यावेळी रहीम हट्‌टीवाले, अमित शहा, शिवाजी मोहिते, ओंकार जाधव, रोहित जगदाळे, निलेश जगदाळे आदी उपस्थित होते. 

उलटसुलट उत्तराने संभ्रम 
महापुरातील नुकसानीबाबत नागरिकांना गेले आठ महिने सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. याच्या चौकशीसाठी तहसीलदार कार्यालयात हेलपाटे घालणाऱ्या नागरिकांना " अजून निधी आलेला नाही किंवा निधी मिळाला असून तो कोविड 19साठी वापरण्यात येत आहे.' अशी उलटसुलट उत्तरे मिळत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT