पश्चिम महाराष्ट्र

सांगलीः जांभुळणी-लेंगरेवाडीत लोकसहभागातून चाराछत्र 

सकाळवृत्तसेवा

सांगली - जांभुळणी व लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे लोकसहभागातून महाराष्ट्रातील पहिले चाराछत्र सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी दररोज जनावरे घेऊन यायचे आणि सायंकाळी पुन्हा घरी जनावरे घेऊन जायची असे या चाराछत्राचे स्वरूप असून पंचक्रोशीतील किमान चारशे जनावरे दररोज त्याचा लाभ घेतील असे नियोजन आहे. सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी अन्य स्वयंसेवी व्यक्ती-संस्थाच्या सहकार्यातून यंदाच्या दुष्काळात ही संकल्पना मांडली असून येत्या 6 मे रोजी या चारा छत्राचा प्रारंभ होणार आहे. 

वस्तुतः संपतरावांनीच मुक्तीसंघर्ष चळवळीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाचा परिपाक म्हणून 10 एप्रिल 1985 मध्ये महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी दुष्काळाविरोधात शाश्‍वत उपाययोजना करण्याच्या दिशेने सतत कृतिशिलता कायम ठेवली. नवे पर्याय द्यायचा सतत प्रयत्न केला. शासनाकडे हात न पसरता स्वाभिमानाने जगण्याची उमेद निर्माण झाली पाहिजे. शासन चौकटीत छावणीच्या निमित्ताने अनेकचुकीच्या प्रथा-पायंडे पडत गेले. शेतकऱ्याने घरदार सोडून छावणीत रहायला जायचे. जनावरांसारखे तिथेच रहायचे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे यासाठीचा हा पथदर्शी प्रकल्प असल्याचा संपतरावांचा दावा आहे. 

ते म्हणाले,""औंध संस्थानच्या अधिपतींनी दुष्काळात जनावरे जगवण्यासाठी गंजीखाना पदती सुरू केली. संकट काळात जनावरे जगवली तर ती पुढे शेतकऱ्यालाही जगवतात. आम्ही आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक स्थलांतर करणाऱ्या अशा परिसरात यावर्षी चारा छत्र सुरू करीत आहोत. त्यासाठी या गावातील जनावरांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. आटपाडी तालुक्‍यातील घरनिकी, बेरगळवाडी, पडळकरवाडी, पिंपरी, जांभूळनी, लेंगरेवाडी, पारेकरवाडी, घानंद, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील जरंडी, घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी या गावांमधील ही जनावरे असतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दिवसातून दोन वेळा चारा वाटप केले जाईल. हा चारा पूर्णतः मोफत दिला जाईल. चाराछत्राच्या व्यवस्थापन खर्चापोटी म्हणून प्रती जनावर दोन रुपये प्रतीदिन शुल्क घेतले जाईल. एका शेतकऱ्याची किमान तीन जनावरे जगावीत असे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी दररोज एकाच ठिकाणी आपली दावन करावी. त्यांना सावलीची व्यवस्था स्वतःच करावी.'' 

ते म्हणाले,""सहाय्यक धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्या हस्ते क्रांती स्मृतीवन परिसरात आम्ही चारा लागवडीस प्रारंभ केला. अर्थात हा चारा पुरेसा नाही. आम्ही सध्या विकत घेऊन पुरवठा करणार आहोत. या उपक्रमासाठी राजेंद्र मदने (सिद्धार्थ स्टार्च), उद्योजक मोहन देशमुख, राष्ट्रीय स्वयंवेक संघाचे विलास चौथाई, कामेरीचे अनिल पाटील, निसर्ग प्रतिष्ठानचे रवींद्र व्होरा, सुनील भिंगे, किशोर पुजारी, श्‍वेता मेथा, सूरज मुल्ला या मंडळींच्या सहकार्याने उपक्रमाची सुरवात झाली आहे. लोकच हा संकल्प तडीस नेतील याची आम्हाला खात्री आहे.'' 

""साधारणत: 17 जूनपर्यंत चाराछत्र सुरू ठेवण्यासाठी पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अंदाजे चार दर पाच रुपये प्रती किलोप्रमाणे साधारणत: एका जनावराला 35 रुपयांचा दररोज चारा लागेल. समाजातील दानशूर व्यक्तींना या चाराछत्रासाठी मदत करावी. चारा,वैरण,पशुखाद्य, पेंड, पाणी, वाहने, चारा जमवणे, वितरण करणे अशा कोणत्याही स्वरूपात मदत चालेल.'' 
- संपतराव पवार,
सामाजिक कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT