पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेत चौथ्यांदा महिलाराज

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापौरपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झाल्याने महापालिकेत पुन्हा महिलाराज येणार आहे. सलग चौथ्यांदा महापौरपद हे महिलेसाठी राखीव झाल्याने पुरुष नगरसेवकांना दहा वर्षांपासून महापौरपदापासून वंचित रहावे लागले.

आज बुधवारी दुपारी तीन वाजता मंत्रालयात महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तीत सोलापूरचे महापौरपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव झाले. यापूर्वी अलका राठोड, प्रा. सुशीला आबुटे, विद्यमान शोभा बनशेट्टी महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. आता चौथ्यांदा हे पद महिलेसाठी राखीव झाले आहे. 

यंदाचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होईल या अंदाजाने अनेकांनी महापौरपदावर विराजमान होण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र त्या सर्वांचे स्वप्न धुळीस
मिळाले आहे. या पदावर सध्या भाजपकडून श्रीकांचना यन्नम यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भाजपमध्ये या प्रवर्गातील नगरसेविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी निवडताना भाजपच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यन्नम यांच्याशिवाय उपमहापौर शशीकला बत्तुल, राजश्री कणके, कल्पना कारभारी, राधिका पोसा, प्रतिभा मुदगल, अनिता कोंडी, मेनका राठोड, अश्विनी चव्हाण, मनिषा हुच्चे या नगरसेविका या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नेते कोणाला प्राधान्य देतात त्यावर महापौरपदाचा उमेदवार निश्चित होईल. सध्याच्या टर्ममध्ये सौ. यन्नम यांचा अडीच वर्षांसाठी दावा होता. मात्र तो प्रत्यक्षात आला नाही. आता दावेदार वाढले आहेत. त्यामुळे महापौर निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट, खरेदी केल्यापासून बंदच, कोट्यवधी रुपये किंमत

Panchang 13 August 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

Solapur News:'५० हजार बहिणी पाठविणार देवाभाऊंना राख्या'; स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महिला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न

Latest Marathi News Updates : माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ED चे समन्स; बेटिंग अ‍ॅप प्रकरणी आज होणार चौकशी

Zilla Parishad : गट, गण प्रारूप रचनेवर सुनावणी पूर्ण; विभागीय आयुक्तांकडून ११५ सूचना व हरकती मान्य; ८८ फेटाळल्या

SCROLL FOR NEXT