
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे मंत्रिपद गेल्यानतंरही अजून सरकारी निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यात राहतायत. पाच महिन्यानंतरही त्यांना बंगला रिकामा न केल्यानं मंत्री भुजबळ सध्या वेटिंगवर आहेत. प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी मुंबईत राहणं आवश्यक असल्याने बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं. मात्र गतवर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना गिरगाव चौपाटीवर असलेल्या आलिशान फ्लॅटचा उल्लेख केला होता. मुंबईथ ४ बीएचके फ्लॅट असूनही धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत यावरून आता चर्चा रंगल्या आहेत.