Solapur Muninipal corporation
Solapur Muninipal corporation 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर: सिद्धेश्‍वर तलावावर महापालिकेचा दावा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर तलाव महापालिकेच्या मालकीचा असल्याचा उल्लेख महापालिकेच्या संकेतस्थळावर आहे. त्यामुळे हा तलाव देवस्थानच्या मालकीचा आहे की महापालिकेचा, हा संभ्रम निर्माण झाला आहे. 

महापालिकेच्या संकेतस्थळावर महापालिकेच्या मालकीच्या भाड्याने दिलेल्या जागा, खुल्या जागा, उद्याने, तलाव, दवाखाने याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये व्यापारी संकुलांसह इतर जागांचीही माहिती आहे. महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागातील महापालिकेच्या मालकीच्या जागा असा विभाग आहे. पान क्रमांक 55वर महापालिकेच्या मालकीच्या तलाव व विहिरींची यादी आहे. त्यामध्ये सिद्धेश्‍वर तलाव आणि धर्मवीर संभाजी तलाव (कंबर तलाव) हे दोन्ही महापालिकेच्या मालकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सिद्धेश्‍वर तलाव परिसरात विविध विकासकामे होणार आहेत. त्यामध्ये प्राधान्याने लेझर शोचा समावेश आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात इतरही विकासकामे केली जाणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य वाढीस लागणार आहे. त्याचीही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. 

सिद्धेश्‍वर तलाव देवस्थान समितीच्या मालकीचाच असल्याची कागदपत्रे आहेत. संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख असेल तर तो काढून टाकण्यात येईल. 
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT