पश्चिम महाराष्ट्र

उजनीच्या पाणीसाठ्यात 12 टक्के वाढ 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मागील 20 दिवसांमध्ये 12.02 टक्‍यांनी वाढ झाली आहे. धरणक्षेत्र व पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने ही वाढ झाली आहे. टीएमसीमध्ये मोजायचे झाले तर या कालावधीत धरणात 6.44 टीएमसी पाणी वाढले असल्याचे दिसून येते. 

जिल्ह्याच्या शेतीचे गणित उजनी धरणावर अवलंबून आहे. धरण 100 टक्के भरले तर जिल्ह्यातील शेती हिरवीगार होते. उजनीच्या पाण्यावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येते. मागील तीन-चार वर्षात दुष्काळामुळे जिल्ह्याच्या उसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, मागील वर्षी व यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. मागील वर्षी धरण 100 टक्के भरले होते. यंदाही तशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

यापुढील नक्षत्रामध्ये पाऊस कसा होतो यावर उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. यंदाच्या वर्षी पावसाने चांगली सुरवात केली आहे. त्यामुळे यंदाही उजनी लवकरच भरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. उजनीची पाणीपातळी वजा 31.23 टक्‍यांपर्यंत गेली होती. मात्र, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणीपातळीमध्ये वाढ होत गेली. आजअखेर धरणामध्ये 12 टक्के पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. धरणामध्ये आज वजा 19.21 टक्के पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा वजा 10.29 टीएमसी इतका आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT