बारावी परीक्षा sakal
सोलापूर

Solapur News: दहावीची उद्यापासून परीक्षा! 'कॉपी'वर विशेष वॉच; जिल्ह्यात १७६ केंद्रे व ६४ हजार ४२४ विद्यार्थी

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून (गुरुवार) बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यात १७६ परीक्षा केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये २० केंद्रे संवेदनशील असून त्यावर शिक्षण विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.

तात्या लांडगे

Solapur News: इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून (गुरुवार) बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यात १७६ परीक्षा केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये २० केंद्रे संवेदनशील असून त्यावर शिक्षण विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.

एका वर्गात २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे. २ मार्च रोजी मराठी तर ६ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर असणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम बसावा, यासाठी पहिल्यांदाच यावर्षी बोर्डाने ठोस पावले उचलली आहेत.

प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर घेऊन येणाऱ्या ‘रनर’वर विशिष्ट जबाबदारी दिली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास, असे एकूण पाच तास बैठे पथक नियुक्तीचा निर्णय झाला.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची विशेष पथके नेमली गेली आहेत.

या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. आता दहावीच्या परीक्षेसंदर्भात देखील तेवढेच तगडे नियोजन असणार आहे.

परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्यांना वर्गात सोडले जाणार आहे. त्यासाठी पोलिस पाटील, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातील ६४ हजार ४२४ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. एकाच वर्गात सामुहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकावर कारवाई केली जाणार आहे.

परीक्षेसंबंधी ठळक बाबी...

  • जिल्ह्यातील ६४ हजार ४२४ विद्यार्थी देणार १७६ केंद्रांवर परीक्षा

  • परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर एक, याप्रमाणे असणार १७६ बैठे पथके

  • जिल्ह्यातील २० संवेदनशील परीक्षा केंद्रांना वरिष्ठ अधिकारी देतील अचानक भेटी

  • पेपर सुरु होताच विद्यार्थ्यांना दिली जाणार प्रश्नपत्रिका; दहा मिनिटांचा शेवटी वाढीव वेळ

  • परीक्षा केंद्राच्या १०० मीटर अंतरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग, संगणक सेंटर, इंटरनेट कॅफे बंद राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT