13 mandai market of solapur traders auction less response
13 mandai market of solapur traders auction less response  Sakal
सोलापूर

Solapur News : मंडईतील ओटे लिलावाला अत्यल्प प्रतिसाद; सोलापूर शहरात १३ मंड्यांतील एक हजार ८६ पैकी केवळ ६४ ओट्यांना बोली

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : सोलापूर महापालिकेच्या विविध १३ मंडईंमधील एक हजार ८६ ओट्यांच्या लिलाव प्रक्रियेला शहरातील भाजी विक्रेत्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याने केवळ ६४ ओट्यांचा लिलाव झाला आहे. आठवडाभर सुरू असणारी ही लिलाव प्रक्रिया ६ मार्चला संपली.

शहरातील कस्तुरबा मंडई, शास्त्री नगर मंडई, मुर्गीनाला मंडई, चैतन्य मंडई, जोडबसवण्णा चौक मंडई, चिप्पा मंडई, विडी घरकुल मंडई, देगाव मंडई, राणी लक्ष्मीबाई मंडई शेड -२, ३, ४, ७, ८, राणी लक्ष्मीबाई मंडईतील नवीन ओटे,

मासे मंडई मंगळवार बाजार आदी ठिकाणच्या मंडईमधील ओट्यांच्या लिलावाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरू होती. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत सर्वात जास्त अशा ३८ ओट्यांचा लिलाव राणी लक्ष्मीबाई मंडईत झाला.

त्याखालोखाल मंगळवार बाजारातील मास मंडईतील २० ओट्यांचा लिलाव यशस्वी झाला. कस्तुरबा मंडईतील दोन व देगाव मंडईतील चार ओट्यांचा लिलाव, असे एक हजार ८६ ओट्यांपैकी ६४ ओट्यांना लिलावात बोली लावण्यात आली. मंडईतील विविध प्रकारच्या वसुली माध्यमातून महापालिकेच्या मंडई विभागाने या आठ दिवसांमध्ये केलेली एक लाख ५० हजार ६०० रुपये वसुली एवढीच समाधानाची बाब आहे.

बोली न लागल्याने शिल्लक राहिलेले ओटे

कस्तुरबा - ८३, शास्त्रीनगर - ४५, मुर्गीनाला - ४९, चैतन्य - ८४, जोडबसवण्णा - ८६, चिप्पा - १६८, विडी घरकुल - ११४, देगाव - ४९, मास मंडई - ००, राणी लक्ष्मीबाई मंडईतील शेड २, ३, ४, ७, ८ व नवीन गाळ्यांसमोरचे मिळून - ३४४, एकूण १०२२ ओटे लिलावात बोली न लागल्याने शिल्लक आहेत.

सध्या अनेक भाजी विक्रेते मंडळी भाजी विक्रीकरिता रस्त्यावर बसत आहेत. नागरिकही रस्त्यांवरील भाजीविक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करतात. रस्त्यावर भाजी विक्री करू नये यासाठी आणखी नियम कठोर करण्यात येतील. त्यानंतर या ओट्यांच्या लिलावास चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

- जगन्नाथ बनसोडे, अधीक्षक, मंडई विभाग, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT