Solapur Siddharameshwar Yatra Sakal
सोलापूर

Solapur Siddharameshwar Yatra : श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी १३०० पोलिसांचा बंदोबस्त

श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातही भाविकांची गर्दी असते. त्यामुळे या काळात अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त १३ ते ३१ जानेवारी या कालावधीत नंदीध्वज मिरवणूक मार्ग, होम मैदान व रेवणसिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी १३११ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मिरवणुकीत पोलिस कर्मचारी बाराबंदीत राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली.

१३ ते १७ जानेवारी हे यात्रेतील मुख्य दिवस आहेत. या कालावधीत महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण व कर्नाटकातून तीन ते चार लाख भाविक येतात. तसेच श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातही भाविकांची गर्दी असते.

त्यामुळे या काळात अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पोलिस बंदोबस्त नेमला आहे. यात तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, ७५ सहायक पोलिस निरीक्षक, एक हजार ३११ पोलिस अंमलदार यांचा समावेश आहेत.

तसेच आक्षेपार्ह संदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मीडिया सर्व्हेलन्स पथकाद्वारे निगराणी केली जाईल. बेवारस वस्तू आढळल्यास भाविकांनी त्याची चौकशी करून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

बाहेरून मागविलेला बंदोबस्त

पोलिस अंमलदार २०० (५० शहर वाहतूक शाखा), महिला पोलिस अंमलदार ५०, पुरुष होमगार्ड ५००, महिला होमगार्ड १००, एसआरपीएफचची एक कंपनी.

महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी महिला गस्ती

  • दामिनी पथकाची नेमणूक

  • सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाची नियुक्ती

  • शहरात एकूण १९ स्टॅटिक पॉइंट

  • सहा ठिकाणी सुरक्षा कठडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT