
सोलापूर : आषाढी वारीनिमित्त अनेक विठ्ठल भक्त आपापल्या परीने विठ्ठल भक्ती करत आहेत. सोलापूरच्या अशाच एका कलाकार विठ्ठल भक्ताने चार तास अथक परिश्रम करून तांदळाच्या दाण्यावर विठ्ठल व रखुमाई साकारण्याची किमया साधली आहे. त्या कलाकाराचे काशिनाथ मल्लीनाथ तावस्कर असे नाव आहे.