141 cities in the country including Barshi mangalwedha Garbage free
141 cities in the country including Barshi mangalwedha Garbage free 
सोलापूर

मंगळवेढा, बार्शीसह देशातील 141 शहरे कचरामुक्त 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयने देशातील 141 शहरे कचरामुक्त म्हणून निवडली. त्यात जिल्ह्यातील मंगळवेढा व बार्शीची निवड झाली असून मंगळवेढा नगरपालिकेने आपल्या कामाचा ठसा 2020 मध्ये कायम ठेवला. 
नगरपालिकेने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण व अन्य कामात आपला ठसा कायम ठेवून मंगळवेढ्याचे नाव कायम ठेवला आहे. यापूर्वी गतवर्षी मंगळवेढा नगरपालिकेचे नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, मुख्याधिकाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला होता. यंदा देशातील 141 शहरे कचरामुक्त निवडण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 76 शहरांचा समावेश आहे. फाइव्ह स्टार शहरात एकाचा तर वन स्टारमध्ये 41 शहरांचा समावेश आहे. सलग दोन वर्ष मंगळवेढा नगरपरिषदेने शहरांतील नागरिक, विविध मंडळ, संस्थांच्या सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सातत्य राखल्याने अडीच कोटी रुपये बक्षीस मिळाले. यातील सव्वा कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला असून उर्वरित सव्वा कोटी रुपये स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये सातत्य राखल्याने प्राप्त होणार आहे. नगरपालिकेत सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासनात वारंवार तक्रारी होत आहेत. परंतु, त्यामुळे नागरिकांत उलट-सुलट चर्चा असताना स्वच्छ सर्वेक्षणसारख्या कामात हे सर्वजण एकजुटीने पालिकेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्न करतात याबाबत समाधान व्यक्त होत आहे. 

भूमिगत गटारीच्या कामास प्राधान्य 
सलग दोन वर्ष नियोजनबद्ध केलेले कामकाज, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवकांचे सहकार्य आणि नागरिकांची साथ यामुळेच नगरपरिषदेस गौरव प्राप्त झाला. शहरांतील स्वच्छतेची कामे व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास खूप मदत होणार आहे. भविष्यात भूमिगत गटारीच्या कामास प्राधान्य असेल. 
- अरुणा माळी, नगराध्यक्षा, मंगळवेढा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT