47 quarantined including 10 doctors in contact with the corona affected woman 
सोलापूर

ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 10 डॉक्‍टरांसह 47 जण क्वारंटाईन 

अभय जोशी

पंढरपूर (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील पेनूर येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्‍टर्स, नर्स आणि संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींसह एकूण 47 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. महिलेच्या बाळाला पुढील तपासणीसाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. 
काही दिवसांपूर्वी सोलापुरातील एका रुग्णालयातून मोहोळ तालुक्‍यातील पेनूर येथील एक महिला पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली होती. त्या महिलेला जुळे झाले होते, त्यापैकी एका बाळाचा मृत्यू झाला. दुसऱ्या बाळाला पंढरपुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्या महिलेत कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे तिला सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. सोमवारी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. 
एकूण दहा डॉक्‍टर्स, नर्स आणि काही नातेवाईक अशा सुमारे 47 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या महिलेच्या बाळाला सोलापूर येथे हलविण्यात आले असून क्वारंटाईन केलेल्या सर्वांची सोलापूर येथे आवश्‍यकतेनुसार तपासणी केली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

Eknath Shinde Aditya Thackeray : "कोण होतास तू, काय झालास तू... अरे वेड्या, असा वाया गेलास तू" एकनाथ शिंदेची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

Mumbai News: प्रवाशांचे हाल संपणार! हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार, कोणती आणि का?

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

SCROLL FOR NEXT