Dr. Parale
Dr. Parale 
सोलापूर

...अन्‌ 60 वर्षांच्या आजीला जीवदान (Video)

अशोक मुरूमकर

सोलापूर : देवासमान मानल्या जाणाऱ्या डॉक्‍टरांकडून सोलापुरात एका 60 वर्षांच्या आजीला जीवदान मिळाले आहे. गेल्या महिन्यात सोलापुरात एका रुग्णालयात हा प्रकार झाला होता. रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे सत्य काय हे "सकाळ'ने जाणून घेतले असून खरोखर हा प्रकार घडला असून आजीला डॉक्‍टरांमुळे जीवदान मिळाल्याचे उघड झाले आहे. 
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या रुग्णालयातील हा सीसीटीव्हीमधील व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आवाज येत नसून फक्त डॉक्‍टर, नातेवाईक आणि रुग्णालयातील कामगार यांच्यात काहीतरी धावपळ असल्याचे दिसत आहे. 27 जानेवारीला उपचारासाठी डॉ. परळे यांच्याकडे एक आजी आल्या होत्या, त्यांच्याबाबत ही घटना घडली आहे. याबाबत डॉ. परळे म्हणाले, 27 जानेवारीला सुमारे 60 वर्षांच्या आजी छातीत दुखत असल्याने तपासणीसाठी आल्या होत्या. मात्र, वेटिंग रूममध्ये असताना अचानक त्यांनी मान टाकली. हृदयाची गती अचानक वाढल्याने त्यांचे हृदय बंद पडले. छातीत दुखत असल्याने त्या आल्या होत्या. म्हणजे त्यांच्या छातीत दुखत होते. हृदयाची गती वाढल्याने 60 टक्के रुग्णांचे प्राण पहिल्या तासात योग्य उपचार नाही झाले तर जातात. त्यामुळे हृदय बंद पडल्यानंतर पहिल्या तीन ते पाच मिनिटांत ते सुरू करणे गरजेचे असते. पाच मिनिटांनंतर हृदय सुरू झाले तरी माणूस गेल्यात जमा असतो. बंद पडलेले हृदय सुरू झाले नाही तर प्राणही जातो. हृदय सुरू करण्यासाठी छातीला मसाज केला जातो. पंपिंग केले जाते. मात्र, त्यासाठी योग्य उपचार होणे गरजेचे असतात. त्याला काहीवेळा शॉकही द्यावा लागतो. अशाच सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीत दिसत असलेल्या आजींबाबत झाली. त्यानंतर आजींनी हालचाल केली. 

रुग्णांनी हृदयविकाराचा झटका आहे, असे समजतातच तत्काळ उपचार घेणे गरजेचे असते. नशिबाने सुविधा उपलब्ध असल्यास प्राण वाचतो. काहीवेळा वेळेत उपचार नाही झाला तर रुग्णांचा प्राण जाण्याची शक्‍यता असते. रुग्णांना त्यांचे महत्त्व समजत नाही. यावरून नातेवाइकांचे गैरसमज होतात, असेही डॉ. परळे यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT