hacker 
सोलापूर

बापरे..! : ऍप डाउनलोड करायला सांगितले अन्‌ खात्यावरून "इतकी' रक्कम गायब 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : तुमच्या पेटीएम अकाउंटची वैधता संपली आहे, असे सांगून एकाने प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करावयास सांगितले अन्‌ अकाउंटचा आयडी क्रमांक विचारून घेत खात्यातून परस्पर 87 हजार रुपये काढून घेतल्याची घटना सांगोला येथे घडली आहे. 

माणिक बापू पवार (रा. नरेंद्रनगर, वासूद रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 10 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास 9405844746 या क्रमांकावरून फोन आला आणि फोनवरील व्यक्तीने, आपल्या पेटीएम अकाउंटची वैधता संपली असल्याचे सांगून प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट हे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ऍप डाउनलोड केल्यानंतर पवार यांना आयडी क्रमांक विचारून घेतला व एक्‍झिट होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचे खाते असलेल्या लोकमंगल बॅंकचे खाते उघडण्यास सांगितले. बॅलन्स अपडेट करण्यासाठी त्यातील फंड ट्रान्सफर हा पर्याय निवडण्यास सांगून त्यांच्या खात्यात असलेले 87 हजार रुपये हडप केले. एका खात्यावर 49 हजार, दुसऱ्या खात्यावर 28 हजार व तिसऱ्या खात्यावर 10 हजार असे परस्पर काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर माणिक पवार यांनी सायबर पोलिस ठाणे, सोलापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावरून कोणकोणत्या खात्यावर किती रक्कम हस्तांतरित झाली याची माहिती उघड झाली आहे. याबाबत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक असलेल्या राजकुमार यादव व पुतुल संत्रा या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेश गवळी तपास करीत आहेत. 

याबाबत सांगोल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून अनोळख्या कोणत्याही क्रमांकावरून फोन आल्यास आपले खाते क्रमांक, ओटीपी किंवा इतर कोणतीही माहिती देऊ नये. माहिती द्यावयाची असल्यास प्रत्यक्ष बॅंकेत जाऊन द्यावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT