worker 
सोलापूर

सोलापूरमधून 955 ऊसतोड मजूर जाणार मुळगावी 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळपास 955 ऊसतोड कामगार सोलापूर जिल्ह्यात अडकले आहेत. राज्यात 38 साखर कारखान्यांमध्ये एक लाख 31 हजार पाचशे ऊस तोडणी कामगार अडकले होते. या कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मार्गदर्शक सूचना दिल्याने या कामगारांचा त्यांच्या मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

माढा तालुक्‍यातील कै. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर 250, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर येथे 13, करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे दहा ऊसतोड कामगार सध्या दक्षिण सोलापूर हद्दीत आहेत. सोलापूर जिल्ह्या शेजारी असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील साखर कारखान्यातील 682 ऊसतोड मजूर हे माळशिरस तालुक्‍यातील 13 गावांमध्ये वास्तव्यास आहेत. माळशिरस तालुक्‍यातील रेडे, गोरडवाडी, इस्लामपूर या भागात आटपाडी येतील साखर कारखान्याचे व श्री श्री श्री सद्‌गुरू शुगर कारखान्याचे हे मजूर आहेत. बीड, यवतमाळ, चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यातील हे ऊसतोड कामगार असून संबंधित साखर कारखान्याच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्यावतीने या कामगारांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

खरिपाचा आगामी हंगाम, शेतीविषयक इतर कामांसाठी आम्हाला आमच्या मूळ गावी जाऊ द्या अशी मागणी सातत्याने या ऊसतोड कामगारांच्यावतीने साखर कारखान्यांकडे होत होती. साखर कारखान्यांनी ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्य सचिवांना कळविली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हे मजूर ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली जाणार आहे. कामगार व त्यांचे कुटुंबीय मूळ गावी पोहोचल्यानंतर या कामगारांचा गाव प्रवेशाची ही जबाबदारी त्या गावातील सरपंचावर सोपविण्यात आली आहे. या निर्णयानुसार राज्यातील किती कारखान्यांमधील किती ऊसतोड मजूर त्यांच्या मूळ गावी परत गेले आहेत त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. 

अशी घ्यावी लागणार दक्षता 
साखर कारखाना परिसरात 14 दिवसांपेक्षा जास्त वास्तव्य झाले आहे अशा कामगारांना संबंधित साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक हे प्रमाणित करणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या सर्व कामगारांची व कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निमोनिया व तत्सम कोणतीही लक्षणे नाहीत सर्दी ताप खोकला ही लक्षणे आढळून येत नाहीत अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. मजुरांचे निवासी पत्ते, संपर्क क्रमांक, त्या गावातील सरपंच यांची ही माहिती साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक संकलित करणार आहेत. ऊसतोड मजूर ज्या जिल्ह्यात सध्या वास्तव्यास आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सर्व माहिती व आराखडा मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. मजूर ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या आराखड्याची व माहितीची एक प्रत दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात थंडीची जोरदार एंट्री, जळगाव महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठले; इतर जिल्ह्यांत कसं आहे हवामान? जाणून घ्या

Sugarcane farmers: 'ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा'; कऱ्हाड तालुक्यात रास्ता रोको; चार हजार दराची मागणी

Manoj Jarange : "मी तयार आहे, आता 'नार्को' चाचणी कराच!" धनंजय मुंडेंचे आव्हान जरांगेंनी स्वीकारले, पोलिस प्रशासनाकडे मागणी

Parliament Session : हिवाळी अधिवेशनाची अल्पपरीक्षा; कमी कालावधीवरून विरोधकांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT