'शेतकऱ्यांनो, पीक पद्धत बदला अन्‌ डाळिब उत्पादक संघ तयार करा!' esakal
सोलापूर

'शेतकऱ्यांनो, पीक पद्धत बदला अन्‌ डाळिब उत्पादक संघ तयार करा!'

'शेतकऱ्यांनो, पीक पद्धत बदला अन्‌ डाळिब उत्पादक संघ तयार करा!'

राजकुमार शहा

कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने पापरी येथे डाळिंबावरील खोड कीड व्यवस्थापन या विषयावर परिसंवाद पार पडले.

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ (Mohol) तालुक्‍यात डाळिंबाचे (Pomegranate) क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. शेतकरी पिकवतो परंतु विकताना अडचणी येतात. त्यासाठी डाळिंब उत्पादक संघ तयार करा, त्यामुळे 'शेतकरी ते थेट ग्राहक' याप्रमाणे मालाची विक्री होईल. मधली साखळी आपोआप बंद होईल. शासनाकडे नोंदणी करा, शेतीच्या प्रगतीसाठी (Agricultural Progress) पीक पद्धतीत बदल करा, नवीन तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांनी आता इंटरनेट सारख्या प्रगत माध्यमांचा वापर करावा, असा सल्ला कृषी उपसंचालक तुकाराम मोरे (Tukaram More) यांनी दिला.

कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने पापरी (ता. मोहोळ) येथे डाळिंबावरील खोड कीड व्यवस्थापन या विषयावर परिसंवाद चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन केले होते, त्या वेळी उपसंचालक मोरे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. या वेळी येथील शेतकरी दिगंबर गायकवाड यांच्या डाळिंब प्रक्षेत्रावर भेटीचे आयोजन केले होते. या वेळी तंत्र अधिकारी भारत कटके, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ पंकज मडावी, मंडळाधिकारी सूर्यकांत मोरे, शेतकरी रवी पाटील, पिंटू गायकवाड, विलास टेकळे, दादा गायकवाड, वामन भोसले, प्रताप भोसले, सतीश लोंढे, तानाजी घागरे, शिवाजी घागरे, कृषी पर्यवेक्षक जे. एस. भडकवाड, भरत सुरवसे, लामतुरे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोरे पुढे म्हणाले, चांगल्या दर्जाच्या फळे उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर टाळा. ते वापरल्यामुळे उत्पादित माल टिकत नाही, तसेच तो एक्‍स्पोर्टही होत नाही. सर्व शेतकरी एकत्र या विचारांची देवाण- घेवाण करा. डाळिंब उत्पादक संघ स्थापनेची मोहोळ तालुक्‍यातून सुरुवात करू. आम्ही सर्वतोपरी मदत करू, असे अश्वासन मोरे यांनी दिले. या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना फवारणीसाठी ट्रायकोडर्मा या बुरशी नाशकाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT