सोलापूर

वैराग येथे ऑनलाईन हेल्पलाईनला प्रारंभ !

कुलभूषण विभूते

रोहित पवार युवा ब्रिगेड व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा सोलापूर यांच्या वतीने राज्यात ग्रामीण भागातून अशा प्रकारचा राबणारा पहिला उपक्रम आहे.

वैराग (सोलापूर) : येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शरदचंद्रजी पवारसाहेब या मोफत हेल्पलाईनचा (Free online helpline) प्रारंभ करण्यात आला.

कोरोना (Corona) महामारीत मदत करण्यासाठी मोफत हेल्पलाईनने (Free online helpline) ग्रामीण भागातील जनतेला फायदा व मदत होईल. हा उपक्रम सामान्यांचा आधार ठरेल. अशा आशावाद खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ऑनलाईन शुभारंभावेळी व्यक्त केला. नोंदणीद्वारे सर्वसामान्यांना घरपोच मदत दिली जात आहे. यासाठी 30 कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत. मोफत लसीकरण, घरपोच धान्य, पालेभाज्या, अंत्यसंस्काराचे साहित्य, मोफत ऍब्युलन्स सेवा व इतक मदत दिली जात आहे. (a free online helpline was launched at vairag to help with the corona epidemic)

रोहित पवार युवा ब्रिगेड व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा सोलापूर यांच्या वतीने राज्यात ग्रामीण भागातून अशा प्रकारचा राबणारा पहिला उपक्रम आहे. यामुळे मानवी जीवनात थेट मदत होईल. असे चांगले उपक्रम सुरु होणे ही काळाची गरज बनली आहे. यामुळे सर्वसामान्यांना फायदा व त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी व्यक्त केले.

यावेळी महिला जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्षा शलाका मरोड-पाटील, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयवंत गुंड, विरोधी पक्षनेते अरुण सावंत, ओम प्रतिष्ठाणचे वैजिनाथ आदमाने, वैराग अभियानाचे किशोर देशमुख, नितीन पाटील, औषध निर्माता अभिजीत कांबळे, आरोग्य पर्यवेक्षक जगदीश ताकभाते, अमरराजे निंबाळकर, बाळासाहेब उज्जनकर, हनुमंत जगदाळे, सुधीर म्हेत्रे, शाम बचुटे, केतन ढेकळे, रविंद्र थोरात, सुधीर गवळी, विलास कोल्हे, कुलदिप ढेकळे आदी उपस्थित होते. नोंदणी, समस्या व अडचण सोडवण्यासाठी नागरिकांना (मो. 8446371411) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तथा या उपक्रमाचे अध्यक्ष समाधान पवार यांनी केले आहे.

(a free online helpline was launched at vairag to help with the corona epidemic)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT