crime
crime esakal
सोलापूर

कर्जाच्या पैशासाठी तगादा लावल्याने टेंभुर्णीत एकाची आत्महत्या!

संतोष पाटील

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दोन सावकारांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी (सोलापूर) : सावकाराने कर्जाच्या पैशासाठी तगादा लावल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना टेंभुर्णीतील (Tembhurni) सुर्ली रस्ता परिसरात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दोन सावकारांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडू महादेव कासवेद (रा. सुर्ली रस्ता परिसर टेंभुर्णी ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी वर्षा खंडू कासवेद ( वय- 37 रा. सुर्ली रस्ता परिसर टेंभुर्णी) हिने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी वर्षा कासवेद हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती खंडू महादेव कासवेद याने सौदागर वसंत साळुंखे (रा. बायपास रोड टेंभुर्णी) व दिलीप कृष्णा गोरे (रा. पंढरपूर) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. मृत्यू व्यक्ती खंडू कासवेद याने सौदागर साळुंखे याचे सात लाख रूपये व दिलीप गोरे याचे पाच लाख रूपये व्याजासह परत करून देखील राहिलेल्या 50 हजार रूपयांसाठी हे सावकार वारंवार घरी येऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सौदागर साळुंखे व दिलीप गोरे या दोन सावकारांविरूध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोनाली पवार या करीत आहेत .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT