Solapur News sakal
सोलापूर

Solapur News : काळविटाची शिंगे विकणाऱ्या तरुणास पकडले,पाच शिंगे हस्तगत; शहर गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

काळविटाची पाच शिंगे विक्रीसाठी आलेल्या अजित अविनाश सरवदे (रा. हब्बू वस्ती, देगाव रोड) याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. पाच शिंगे हस्तगत करून त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : काळविटाची पाच शिंगे विक्रीसाठी आलेल्या अजित अविनाश सरवदे (रा. हब्बू वस्ती, देगाव रोड) याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. पाच शिंगे हस्तगत करून त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या पथकाला १६ जून रोजी खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. एक तरुण काळविटाची शिंगे विक्रीसाठी बाळीवेस परिसरात येणार असल्याचेही खबऱ्याने पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिस पथकाने त्याठिकाणी सापळा रचून अजित सरवदे याला पकडले.

त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना देखील त्याने बेकायदेशीरपणे काळविटाची शिंगे स्वत:कडे ठेवली होती. काळविटाची शिंगे कोठून आणली, यासंदर्भात त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आपणही कोणाकडून तरी विकत घेतल्याचे सांगितले.

फौजदार चावडी पोलिस अधिक तपास करीत असून, संशयित आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अंमलदार दिलीप किर्दक, वाजिद पटेल, संजय साळुंखे यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT