ST Accident Sakal
सोलापूर

ST Accident : बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने सात फूट खड्यात बस उलटली; सुदैवाने जिवीतहानी टळली

कुर्डूवाडीवरुन वैरागकडे जाणारी एसटी सुर्डी -मालवंडी दरम्यान असलेल्या रवि अॅग्रो प्रोसेसिंग प्लँटजवळ स्टेरिंग रॉड तुटल्याने पाच ते सहा फूट खोल असलेल्या खड्डयामध्ये कोसळली.

भीष्माचार्य ढवण

कुर्डूवाडीवरुन वैरागकडे जाणारी एसटी सुर्डी -मालवंडी दरम्यान असलेल्या रवि अॅग्रो प्रोसेसिंग प्लँटजवळ स्टेरिंग रॉड तुटल्याने पाच ते सहा फूट खोल असलेल्या खड्डयामध्ये कोसळली.

सासुरे - कुर्डूवाडीवरुन वैरागकडे जाणारी एसटी सुर्डी -मालवंडी दरम्यान असलेल्या रवि अॅग्रो प्रोसेसिंग प्लँटजवळ स्टेरिंग रॉड तुटल्याने पाच ते सहा फूट खोल असलेल्या खड्डयामध्ये कोसळली. यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. कुर्डूवाडी डेपोतून सकाळी साडेआठ वाजता (एमएच 14 - BT - 1191) या क्रमांकाची बस वैरागकडे निघाली होती. मात्र, मालवंडी येथून प्रवासी घेऊन पुढे मार्गस्थ झालेल्या बसच्या स्टेरींगचे रॉड तुटून स्टेरींगच हातात आल्याने बसचालक दत्तात्रय माळी यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि सुर्डीजवळ असलेल्या रवि अॅग्रो प्रोसेसिंग प्लॅटजवळ रोडच्या बाजूला असलेल्या चरीत जाऊन ही बस पलटली. येथेच रोडलगत असलेल्या वैराग-जामगावच्या 220 KV असलेल्या मेन लाईनच्या पोलच्या ताण तारेवर जाऊन आदळली.

रोडपासून हे अंतर ५ / ६ फूट खोल असल्याने बस रोडवरून खाली आदळल्याने प्रवाशांना जबर मुक्का मार लागला. एसटीचेही मोठे नुकसान झाले असून, एसटीची डीझेल टाकी लीक होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर डिझेल वाया गेले. यात लाईटचे ४ ते ५ खांब वाकले असून विद्युत प्रवाहाच्या ताराही तुटल्या आहेत. विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात सकाळी पावणेदहाच्या वेळेस घडला.

बस पलटल्यानंतर प्रवाशांनी मोठा आक्रोश केला

बसच्या मागील व पुढील काचा काढून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ३५ प्रवाशांमध्ये काही महिलांचाही समावेश होता. अपघातानंतर वाहक व चालक दोघेही भयभीत झाले होते. वाहक वैभव क्षीरसागर यांनी तत्काळ प्रसंगावधान साधून मोबाईलवरुन वैरागच्या आरोग्य केंद्राशी संपर्क केला व अॅम्बुलन्स बोलावून जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.

महापारेषण विभागाच्या 220 केव्ही विद्युत पुरवठा करणाऱ्या पोलवर बस आदळल्याचे समजताच प्रसंगावधान साधत विनोद गोसावी, संजय पाचपुंड, निलेश होनराव, सचिन गंगाधर यांनी विजेचे कनेक्शन सोडवून सदर क्षेत्रातील विजपुरवठा खंडीत करून संभाव्य धोका टाळला.

माढा- वैराग मार्ग खराब असल्याचे सकाळने वारंवार वृत्तांकन करुन सर्वांच्या निदर्शनास आणले आहे. महिण्यापूर्वीच येथे उसाचा ट्रक पलटल्याचे वृत्तांकन ही सकाळने केले होते. रस्ता खराब असल्याने बसेसमध्ये बिघाड होणे, अपघात होणे या घटना घडत आहेत.

स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस आवरेना झाली. बसचा अपघात होत असल्याची जाणीव बसमधील प्रवाशांना झाली. तेव्हा आमच्या काळजाचा थरकाप उडाला होता. बस रोडवरून खाली घसरली आणि खड्यात पडली. तेव्हा प्रवासी एकमेकावर आदळले. बस डाव्या बाजूला पलटल्याने डावीकडील लोकांना जोराचा मुक्का मार लागला.

- आश्वीनी गुंड, बसप्रवासी जामगांव, ता. माढा

मालवंडीनंतर भिसे वस्ती स्टॉप घेतला. त्यानंतर शंभर मीटर अंतरावर उसाचे दोन वाहन आडवे आले. रस्ता खराब असल्याने बस साईडला घेताना बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला याची मला जाणिव झाल्यानंतर ब्रेक व हँडब्रेक वर बस कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, लेफ्ट साईडचे टायर घसरले आणि गाडी खड्यात पडली .सुदैवाने किरकोळ जखमा वगळता कुणालाही गंभीर इजा झाली नाही.

- बसचालक दत्तात्रय माळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT