Kudale 
सोलापूर

चटका लावणारी घटना ! माळीनगर येथे पतीच्या निधनानंतर पत्नीचेही अवघ्या तीन दिवसांत निधन

प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : पतीच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसांत पत्नीचेही निधन झाले आहे. माळीनगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे माळीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कमी अंतराने झालेले पती - पत्नीचे निधन माळीनगरकरांना चटका लावून गेला आहे. 

येथील गट नंबर दोन येथे राहणारे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत नारायण कुदळे यांचे बुधवारी (ता. 7) निधन झाले होते. ते अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी सुवर्णा चंद्रकांत कुदळे या देखील त्याच रुग्णालयात उपचार घेत होत्या. 

चंद्रकांत कुदळे यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून त्यांचे कुटुंब व नातेवाइकांना सावरायला नियतीने वेळच दिला नाही. पतीच्या निधनानंतर तीनच दिवसांत अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत असलेल्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कुदळे यांच्यावरही काळाने झडप घातली. त्यांचे आज (शनिवारी, ता. 10) उपचारादरम्यान निधन झाले आहे. 

कुदळे कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगामुळे माळीनगरात हळहळ व्यक्त होत आहे. 

काही दिवसांपूर्वी चालता-बोलता फिरणारे चंद्रकांत कुदळे यांचे अचानक निधन झाल्याने माळीनगरकरांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता.तोच त्यांच्या पत्नीची जीवनयात्रा आज संपल्याने माळीनगर पुरते हादरून गेले आहे.आईवडिलांच्या अचानक जाण्याने त्यांची मुले आता पोरकी झाली आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT