mahavitaran and ntpc program sakal
सोलापूर

शेती अन्‌ उद्योगाला आता मुबलक, अखंडीत वीज! 'एनटीपीसी' उभारणार सौरउर्जा प्रकल्प

कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. भारताने देशाअंतर्गत वीजेची गरज भागविली आहे. आता शेजारील देशांनाही भारत वीजपुरवठा करीत असल्याची माहिती एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक एन. श्रीनिवासनराव यांनी दिली. एनटीपीसीच्या वतीने सोलापुरात वर्षाखेरीस २३ मेगावॅटचा सौर प्रकल्प साकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तात्या लांडगे

सोलापूर : वीज तुटवड्याकडून विजेच्या मुबलकतेकडे प्रवास सुरु असतानाच केंद्र शासनाने Power@2047 हे उद्दिष्ट ठेवून भारताला ऊर्जाक्षम बनविण्याची मोहीम हाती घेतली आहे. उद्योजक, शेतकरी व सर्व नारिकांना मुबलक व निरंतर वीज देण्याचे या मोहिमेचे ब्रीद आहे. शेती, उद्योगांना अखंडीत व मुबलक वीज देण्याचा प्रयत्न कंपन्या अविरत करत असल्याचे कौतुक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

‘आझादी का अमृत महोत्सव‘अंतर्गत ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ महोत्सव महाराष्ट्रासह देशभरात राबविला जात आहे. त्यानिमित्त बुधवारी (ता. २७) नियोजन भवनात महावितरण व एनटीपीसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. संसदेच्या अधिवेशनामुळे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिल्ली येथून ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक एन. श्रीनिवासनराव, महाव्यवस्थापक दिपकरंजन व महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, अक्कलकोट येथेही कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सांगळे यांनी केले. त्यावेळी त्यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय, सौभाग्य, एकात्मिक विद्युत विकास, कुसुम अशा केंद्र सरकारच्या योजनांची व राज्यशासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, सौरपंप, उच्चदाब वितरण प्रणालीसह योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता राजेश मदने यांनी केले. आभार शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी मानले.

थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सन्मान

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांवर आधारित विविध चित्रफिती या कार्यक्रमात दाखविण्यात आल्या. तर वीजचोरी हा एक कलंक असल्याचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. कृषी धोरणांतर्गत ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी भरुन ६० टक्के माफीचा लाभ घेतला, त्यांचा प्रातिनिधीक सत्कार करुन थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्रही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. त्यापैकी रामचंद्र कुलकर्णी व अक्षय रस्ते या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करुन प्रत्येकाने कर्तव्य समजून वीजबिल भरण्याचे आवाहन केले. रे-नगरच्या नलिनी कलबुर्गी यांनी त्यांच्या भागात महावितरणतर्फे सुरु असलेल्या वेगवान कामांचे कौतुक केले.

एनटीपीसी साकारणार सौर प्रकल्प

कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. भारताने देशाअंतर्गत वीजेची गरज भागविली आहे. आता शेजारील देशांनाही भारत वीजपुरवठा करीत असल्याची माहिती एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक एन. श्रीनिवासनराव यांनी दिली. एनटीपीसीच्या वतीने सोलापुरात वर्षाखेरीस २३ मेगावॅटचा सौर प्रकल्प साकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT