Kirit Somaiya esakal
सोलापूर

बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार! किरीट सोमय्यांचं अजित पवारांना आव्हान

विनायक होगाडे

सोलापूर : किरीट सोमय्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबियांवर मोठे आरोप केले आहेत. अजित पवारांच्या बहिणी जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत आणि याबाबतचे पुरावे मी ईडीला पाठवणार आहे, असा छातीठोक दावा त्यांनी केला आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना हा दावा खोटा पाडण्याचं खुलं आव्हान दिलं आहे.

किरीट सोमय्या यावेळी म्हणाले की, अजित पवार, शरद पवार म्हणत आहेत की, माझ्या बहिणींचा काय संबंध नसताना ईडी चौकशी करत आहे. मात्र, अजित पवारांच्या बहिणी आणि त्यांचे मेहुणे जरंडेश्वर कारखान्यात पार्टनर आहेत. त्यामुळे तुम्ही कुणाशी बेईमानी करत आहात? ही बेईमानी बहिणीशी की महाराष्ट्रातील जनतेशी? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे त्यांनी पवार कुटुंबियांना आव्हान देत म्हटलंय की, माझं शरद पवारांना चॅलेंज आहे की हे चोपडे मी उद्या ईडी आणि इनकम टॅक्सला पाठवणार आहे. सहकार न्यायालयाला ही पाठवणार आहे. यातला एकही कागद खोटा असेल पवार कुटुंबियांनी मला सिद्ध करुन दाखवावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : काँग्रेस आणि समाजवादी पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारण करण्यात मग्न होते - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Work Culture and Migraine: वर्क कल्चरचा सायलेंट साइड इफेक्ट! ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांमध्ये का वाढतोय मायग्रेन?

Navi Mumbai: कचऱ्यातील भाजीपाला पुन्हा विक्रीस? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT