Crime 
सोलापूर

तब्बल सहा वर्षांपासून फरार अत्याचारी अखेर जेरबंद ! अक्कलकोट उत्तर पोलिसांची कामगिरी 

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : बलात्कार व पोक्‍सो गुन्ह्यातील गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीस अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले. अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव बापू सिद्धा कुसेकर (वय 30, रा. उडगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की संशयित आरोपी बापू कुसेकर याच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गु.र.नं.-31/2015 भा.दं.वि. क.363,366 (अ),376 (2) (आय),506 सह पोक्‍सो कलम 4 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. 22 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी दोनच्या दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीच्या मुलीला ती घरी एकटी असताना तिला मिरजगी फाटा ते सलगरला जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या दगडाच्या खाणीत नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने उत्तर पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी बापू सिद्धा कुसेकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून सहा वर्षे फरार होता. 

आरोपीबाबत पोलिस पथकाला, तो आरोपी उडगी गावाकडून गळोरगी गावाकडे चालत जात आहे, अशी खबर मिळाल्यावर पोलिस पथक खासगी वाहनाने रवाना झाले. पोलिस गळोरगी ते उडगी रोडवरील एका शेतात दबा धरून बसले होते. तेव्हा संशयित आरोपी हा चालत येताना दिसला. पोलिसांना पाहून तो रानातून पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत. 

ही कामगिरी पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, पोलिस हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, विपिन सुरवसे, पोलिस नाईक महादेव चिंचोळकर यांनी केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT