Alcohol is available to alcoholics in Sangola 
सोलापूर

सांगोल्यात मद्यपींना बक्कळ दारू उपलब्ध 

उमेश महाजन

महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) : लॉकडाउन आणि संचारबंदी असतानाही सांगोला तालुक्‍यात तळीरामांना जादा दराने बक्कळ दारू उपलब्ध होत आहे. या तळीरामांनी वाकी-शिवणे येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना परिसराला आपला दारूचा अड्डाच बनवला आहे. कारखाना कार्यालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचे मोठमोठे ढीग लागले आहेत. 
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आणि संचार बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे दारूची दुकाने, परमिट रूम व बीअर बार महिन्यापेक्षा अधिक काळापासून सगळं काही बंद आहे. बाहेर फिरता येत नाही आणि दारूही मिळत नाही. यामुळे तळीरामांच्या जीवाची घालमेल सुरू आहे. दारुसाठी वाट्टेल ते करायला हे तळीराम तयार आहेत. तळीरामांची तगमग लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी आपले उखळ पांढरे करायला सुरु केले आहे. मूळ किमतीच्या दुप्पट, तिप्पट रक्कम देऊन तळीराम दारू विकत घेताना दिसून येत आहेत. 
तळीरामांच्या या अवस्थेचा गैरफायदा घेणाऱ्या दारू विक्रेत्यांनी स्वतःच स्वतःची परमिट रूम व बियर बार फोडून पोलिसांना चकवा देण्याचे प्रकार या परिसरात घडला आहेत. शिवाय बीअर बारच्या परिसरात दारू विकणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रकारही या भागात घडले आहेत. याचाच अर्थ या परिसरात ज्यादा दराने बक्कळ दारू उपलब्ध असल्याची चर्चा आहे. 
वाकी-शिवणे येथे मुख्य रस्त्याच्याकडेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना आहे. अगोदरच बंद अवस्थेत असणाऱ्या आणि त्यात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे या कारखाना परिसरात कोणीही येत नाही. रस्त्याच्याकडेला कारखाना कार्यालय व संस्थापक अध्यक्ष पांडुरंग भांबुरे यांचे समाधीस्थळ आहे. हा परिसर तळीरामांनी आपला दारूचा अड्डाच बनविला आहे. लॉकडाऊन काळात दारू, बीअर रिचवून रिकाम्या बाटल्या समाधी व कारखाना कार्यालय परिसरात टाकल्याने अक्षरशः या ठिकाणी बाटल्याचा ढिगारा साचला आहे. या दारुड्यामुळे कारखाना परिसरास बकाल रूप आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT