सोलापूर

सोलापूर "झेडपी'च्या सर्वच शाळा डिजिटल 

संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या दोन हजार 799 शाळा जिल्ह्यात विखुरलेल्या आहेत. जिल्ह्यातील या सर्व शाळा ई-लर्निंग व डिजिटलयुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजिटल झाल्याने या डिजिटलायझेशनचा उपयोग विद्यार्थी स्वतःहून शिकण्यासाठी करून घेऊ लागला आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांत असलेल्या बहूवर्ग अध्यापन पद्धतीत डिजिटल वर्गातील विद्यार्थी त्यांच्या गरजेप्रमाणे स्वतः शिकतात. विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्यास डिजिटल वर्गाची मदत होते. डिजिटल अध्ययन-अध्यापनात अवघड संकल्पना मुलांच्या लवकर लक्षात येतात. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल शाळा झाल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडील आकर्षण कमी झाले आहे. गणिताचे कठीण संबोध मुलांच्या लक्षात यायला लागले आहेत. कृतियुक्त अध्ययन-अध्यापनाला चांगला वाव मिळत आहे. काही शाळांत मुलांच्याकडे स्वयंअध्ययनासाठी टॅब आहेत. काही पालकांनी मुलांना घरी स्वयं अध्ययनासाठी मोबाईल उपलब्ध करून दिले आहेत. बहुतांशी विद्यार्थी टॅब, मोबाईल व वर्गातील संगणक स्वतः चालू करतात. त्यांच्या सोईप्रमाणे पाहिजे तो विषय उघडून आनंदाने शिकत राहतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षक ऑनलाइन गृहपाठ पाठवितात. पालक आनंदाने घरी मुलांचे गृहपाठ करून घेत आहेत. 
सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डिजिटल शाळा विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. डिजिटल शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना त्याचे बऱ्यापैकी ज्ञान झाले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना घरात बसूनच अध्ययनाचे काम करत असल्याचे प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

तालुकानिहाय डिजिटल शाळांची संख्या 
अक्कलकोट-257, बार्शी-179, करमाळा-228, माढा-295, माढा-393, मंगळवेढा-183, मोहोळ-248, पंढरपूर-338, सांगोला-389, उत्तर सोलापूर-100, दक्षिण सोलापूर-189, एकूण-2799. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

SCROLL FOR NEXT