शिक्षक Esakal
सोलापूर

जुलै संपत आला तरी प्राथमिकच्या शिक्षकांना जूनचा पगार नाही !

जुलै संपत आला तरी प्राथमिकच्या शिक्षकांना जूनचा पगार नाही ! जिल्ह्यातील दहा हजार शिक्षक प्रतीक्षेत

रमेश दास

जिल्ह्यातील दहा हजार प्राथमिक शिक्षकांना जून महिन्याचा पगार जुलै संपत आला तरी अद्याप झाला नसल्याने वेतनासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

वाळूज (सोलापूर) : जिल्ह्यातील दहा हजार प्राथमिक शिक्षकांना (Primary School Teacher) जून महिन्याचा पगार जुलै संपत आला तरी अद्याप झाला नसल्याने वेतनासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. वेतनातून कपात होणाऱ्या विविध कर्जांचे हप्ते थकल्याने भुर्दंड वाढला आहे. पगारातून कपात होणारे गृहकर्ज, सोसायट्या, पर्सनल लोन, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्डचे (Credit Card) हप्ते थकल्याने व्याजाच्या दंडाचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे. दरवर्षी मार्च एंडला शिक्षकांच्या पगाराची, अशी अवस्था असते. मात्र यावर्षी जून पेड जुलैचा पगारही जुलै संपत आला तरी अद्याप झालेला नाही. कधी सिस्टीम ढेपाळते, कधी लिपिकाचा हिशोब चुकतो तर कधी अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांचे टेबल बदलतात तर कधी बदल्या होतात. अशा या ना त्या कारणाने पगाराला काही ना काही अडथळा असतोच. (Although July is over, primary school teachers do not have a June salary-ssd73)

प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान पगार करण्याचा शासन आदेश असताना मागील वीस वर्षात अपवाद वगळता 1 तारखेला पगार कधीच झालेला नाही. उलट कहर म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवट नसतानाही जून महिन्याचा पगार जुलै संपत आला तरी झालेला नाही. प्रत्येक वर्षी जानेवारीपासून "मार्चअखेर' या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे शिक्षकांच्या पगारावर ऐन टंचाईच्या काळात "संक्रांत' बसलेली असते. त्यातच जिल्हा परिषदेतील (Solapur Zilla Parishad) सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांपेक्षा शिक्षक संख्या सर्वात जास्त असते. "मार्चअखेर' हे सरकारी वाक्‍य सर्वांना परिचयाचे झाले आहे. म्हणजे सर्व शासकीय यंत्रणा, कर्मचारी वर्ग, वेतन करणाऱ्या बॅंका, एवढंच काय संगणकीय वेतन प्रणालीला सुद्धा मार्चएंड आहे. एवढे दोन, तीन महिने पगाराला उशीर तर होणारच, एवढं अंगवळणी पडले आहे. अनेक शिक्षकांनी राष्ट्रीयकृत बॅंकेतून होणाऱ्या पगारावर गृहकर्ज, मुलींचे शैक्षणिक कर्ज, काही अडचणीमुळे वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड, सोसायट्यांचे हप्ते हे बॅंकांनी निश्‍चित केलेल्या तारखेला संगणक प्रणालीतून पगार खात्यातून आपोपाप कपात होतात. मात्र जुलैची 26 तारीख उलटली तरी अद्याप जूनचे वेतन झालेले नाही. याचा परिणाम बॅंकांच्या व्याजावर होतो. कर्मचाऱ्याची बॅंकेतील "पत' खराब तर होतेच शिवाय व्याजावर चक्रवाढ व्याज लागते.

पगाराच्या अपडेट गेल्या फेल

जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक संघटना आणि त्यांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप आहेत. काही शिक्षक नेते महिनाभर जिल्हा परिषदेमधून पगाराची माहिती घेऊन अपडेट टाकत असतात. मात्र पगार लांबल्याने सर्वांच्या अपडेट म्यान झाल्या आहेत.

प्राथमिक शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला व्हावा, अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांची आहे. मात्र या ना त्या कारणाने पगार कधीच एक तारखेला होत नाहीत. त्यामुळे शिक्षक अडचणीत सापडत आहेत. पगार एक तारखेलाच व्हायला हवा.

- संजीव चाफाकरंडे, जिल्हा कार्याध्यक्ष, आदर्श शिक्षक समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT