Need Solapur : घरातच अडकलेल्या 
अरूण कामतकरांची मदतीसाठी आर्त हाक
Need Solapur : घरातच अडकलेल्या अरूण कामतकरांची मदतीसाठी आर्त हाक  sakal
सोलापूर

Solapur : घरातच अडकलेल्या अरूण कामतकरांची पायाच्या उपचार खर्चासाठी मदतीची आर्त हाक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अनेक वर्षे चालक म्हणून व्यवसाय केल्यानंतर केवळ पायाच्या दुखण्यावर लागणाऱ्या उपचार खर्चासाठी अरूण कामतकर हे घरातच अनेक वर्षापासून अडकून पडले आहेत. एकदा उपचाराची मदत मिळाली तर पुन्हा स्वावलंबी जीवन होऊ शकताे, अशी त्यांची आशा आहे. अरूण कामतकर हे मुळचे सोलापूरचे आहेत. शालेय शिक्षणानंतर ट्रकलाईन मध्ये गेले. सुरवातीला ट्रक क्लीनर म्हणून काही वर्षे काम केले.

नंतर ट्रक चालक झाले. अनेक वर्षे ट्रक चालक म्हणून काम केल्यावर त्यांनी एसटीच नोकरी स्वीकारली. एसटीत त्यांनी एसटी कामगार सेनेसारख्या संघटनेत विभागीय सेक्रेटरी म्हणून काम केले. संघटनेच्या बांधणीत त्यांनी मोठे योगदान दिले. संघटनेच्या कार्याला त्यांनी झोकून घेतले होते. नंतर त्यांनी वैयक्तीक कारणावरून एसटी खात्याकडील नोकरीचा राजीनामा दिला.

वर्ष २००७ मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते एकटेच घरसंसार सांभाळत होते. ट्रकवर अनेक वर्षे काम केल्यानंतर सुरवातीला त्यांना काही वर्षापूर्वी तळपाय दुखण्याचा त्रास सुरु झाला. नंतर त्यांचे पाय दुखायला लागले. हळूहळू त्यांना चालण्याचा त्रास होऊ लागला. ते घरातच एकटे अडकलेले होते. घराबाहेर पडणे अशक्य झाले.

स्व. विष्णूपंत कोठे अन्नछत्र योजनेतून त्यांना घरच्या घरी जेवणाचा डबा मिळू लागला. घरमालक श्री. जगदाळे यांनी त्यांना आहे, त्या घरात थांबण्यासाठी मदत केली. त्यांनी अनेक वेळा अस्थिरोग तज्ञ व न्युरॉलॉजीस्ट यांच्याकडे तपासण्या व निदानासाठी प्रयत्न केले. पण योग्य निदान झाले नाही. शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यानंतर त्याला काही रक्कम कमी पडली. नंतर शस्त्रक्रिया करुच नये, असे अन्य डॉक्टरांनी सुचवले.

केवळ कंबरेच्या स्नायूत शक्ती नसल्याचे कारण समोर आले. अखेर त्यांना आयुर्वेदतज्ञांनी उपचार करण्याचे मान्य केले. पण जवळ कोणतीही रक्कम शिल्लक नाही. केवळ एका वॉकरच्या मदतीने ते घरात कसेबसे चालतात व फिरतात. पण बाहेर जाता येत नाही. या स्थितीत त्यांना पंढरपूरला आयुर्वेद तज्ज्ञाकडे नेण्यासाठी वाहनाची, स्वयंसेवी कार्यकर्त्याची गरज तसेच उपचार कालावधीत मदतीची गरज आहे.

एवढी मदत मिळून ते स्वतःपायावर उभे राहिले की ते झालेल्या खर्चाची रक्कम परतफेड करण्यात देखील तयार आहेत. त्यांनी राजकीय नेते, ज्ञाती संघटना आदींकडे मदत मागितले, पण केवळ आश्वासने मिळाली. तरीही त्यांना योग्य मदत मिळाल्यास आपण स्वावलंबी जीवन जगू असा त्यांना विश्वास वाटतो.

अरुण कामतकर यांना उपचारासाठी पंढरपूरच्या दवाखान्यापर्यंत पोचवणे, उपचाराचा खर्च यासाठी त्यांना आर्थिक मदत व सोबत येण्याची गरज आहे. त्यांनी त्यांच्या मोबाईल क्र. ८३८०९६२६३६ वर संपर्क साधावा अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे. ते सध्या निराळे वस्तीतील हिंदू रक्षक कट्टा भागात ते राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT