anger of having daughter second time harassment married woman
anger of having daughter second time harassment married woman sakal
सोलापूर

सोलापूर : दुसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग; विवाहितेचा सासरी छळ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दुसऱ्यांदाही मुलगी झाल्याचा राग मनात धरून पतीसह सासरच्यांनी छळ केल्याची फिर्याद शहबाज इम्रान अत्तार (रा. मोमीन नगर, मुळेगाव रोड) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. या प्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यासह नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.शहबाज यांचा इम्रान आत्तार याच्याशी विवाह झाला होता. सुरवातीला काही महिने त्यांचा संसार सुखाने सुरु होता. त्यांना पहिली मुलगी झाली.

त्यानंतर १० फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांना दुसऱ्यांदाही मुलगीच झाली. त्याचा राग मनात धरून सासरच्यांनी तिचा छळ सुरु केला. तू तुझ्या आई-वडिलांकडून हुंडा, पैसे, दागिने आणले नाहीत, दोन्ही मुलीच जन्माला घातल्या, तू दरिद्री आहे. तुझा पायगुण चांगला नाही, तू आमच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही, असे बोलून सातत्याने त्रास दिला. तसेच माहेरून नवीन फ्रिज, सोफासेट, कपाट असे साहित्य आण म्हणूनही मारहाण केली. शहबाज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती इम्रान दस्तगीर अत्तार, सासू सलिमा दस्तगीर अत्तार, सासरा दस्तगीर इमामसाब अत्तार, अबुबकर अत्तार, शबाना समीर अत्तार, समीर रशीद अत्तार, शबानाची जाऊ यास्मीन इरफान पठाण, नाजीया अश्‍पाक अत्तार, अश्‍पाक अहमद अत्तार (सर्वजण रा. मोमीन नगर, मुळेगाव रोड) यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करीत आहेत.

जेवण जास्त बनविल्याने मारहाण

शहबाज यांनी २८ जानेवारी २०२२ रोजी घरातील सर्वांसाठी स्वयंपाक तयार केला. सर्वजण जेवल्यानंतर जेवण अधिक झाले. त्याचा जाब विचारून पती इम्रानसह सर्वांनीच शहबाजला शिवीगाळ केली. त्यानंतर पती इम्राने याने घरातून प्लास्टिक पाईप आणला आणि शहबाजच्या सर्वांगावर मारहाण केली. त्यामध्ये तिला खूप मार लागला, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT