solapur civil hospital

 

sakal

सोलापूर

‘सिव्हिल’मधून दिलेली आणखी १७ दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस! वैद्यकीय तपासणीशिवाय दिली प्रमाणपत्रे; सोलापूर क्राईम ब्रॅंचकडून कागदपत्रांची पडताळणी, ७ जणांचा जामीन फेटाळला

सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून ८ जणांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय आणखी १७ प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली असून त्या व्यक्तींची मूळ कागदपत्रे पडताळली जात आहेत. या सर्वांना वैद्यकीय तपासणीशिवाय प्रमाणपत्रे देण्यात आली असून सोलापूर शहर गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून ८ जणांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय आणखी १७ प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली असून त्या व्यक्तींची मूळ कागदपत्रे पडताळली जात आहेत. या सर्वांना वैद्यकीय तपासणीशिवाय प्रमाणपत्रे देण्यात आली असून सोलापूर शहर गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.

दीड वर्षांत सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून तीन हजार ७१४ दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. या काळात रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून संशयित आरोपी कनाके कार्यरत होता. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या शोधासाठी अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी त्रिस्तरीय समिती नेमली आहे. या समितीला आणखी चार प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली असून सोमवारी (ता. १०) त्याची माहिती शहर गुन्हे शाखेला देण्यात आली आहे.

दुसरीकडे अटकेतील संशयितांनी परजिल्ह्यातील आणखी १३ जणांना सोलापूरच्या ‘सिव्हिल’मधून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय समितीकडे या १३ जणांची कागदपत्रे मागितली आहेत. आतापर्यंतच्या तपासात २५ जणांना दिव्यांग नसताना देखील दिव्यांग प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील पथक करीत आहेत.

संशयितांचा जामीन नाकारला, अन्‌...

दिव्यांग प्रमाणपत्र बोगस काढणारा, काढून देणारे आणि मध्यस्थी करणारे एजंट, अशा आठ जणांना शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात राजेश भाऊसाहेब जाधव, महेश दिनकर बारगजे, राजेश उमाकांत ढवण, विजय बाबासाहेब गर्जे (चौघेही रा. अहिल्यानगर) व अरुण रामदास शिंपी (रा. नाशिक) या परजिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. तर यांना सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील वसीम शौकत खान, सागर गोविंद रजपूत व तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश भाऊराव कनाके यांचाही समावेश आहे. यातील शिंपी याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नसून बाकीच्या सात जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT