Another death due to corona in Barshi taluka 
सोलापूर

बार्शी तालुक्‍यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोना संसर्गामुळे सोमवारी वैराग येथील 68 वर्षीय बाधित वृद्धाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने रात्री जाहीर केले. तालुक्‍यात जामगाव (आ) नंतर हा दुसरा मृत्यू असून मृतांची संख्या दोन झाली आहे. तालुक्‍यात 32 जण कोरोनाबाधित असून 34 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. 
सोमवारी रात्री वैराग येथील 68 वर्षीय वृद्ध पुरुषाचा रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात 6 जून रोजी उपचारासाठी दाखल केले होते. यापूर्वी बार्शी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना 22 जून रोजी एका बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचा रिपोर्ट कोरोनाबाधित आला होता. 
दरम्यान, कसबा पेठ हांडे गल्ली येथील एक स्त्री, शिवाजीनगर येथील एक स्त्री तर उपळाई ठोंगे येथील एक पुरुष असे तिघे जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील 32 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. यात 19 पुरुष, 13 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाबाधित दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनाने त्या रुग्णाच्या संपर्कातील बार्शी येथील 17 तर वैराग येथील सात जणांचे स्वॅब घेतले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT