diesel theft 
सोलापूर

तरटगाव-शिंगोलीदरम्यान पंपावरील डिझेल चोरीची दुसरी घटना ! तीन लाखांच्या डिझेलची चोरी 

अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : सोलापूर - मंगळवेढा महामार्गावरील तरटगाव- शिंगोली दरम्यान ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढ) येथील पंपावरील सव्वा लाखाच्या डिझेल चोरीच्या घटने पाठोपाठच तरटगाव (ता. मोहोळ) येथील शहा हंसराज जीवन या पपंपावरून दोन लाख 92 हजार 390 रुपये किमतीचे सुमारे तीन हजार पाचशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. 11) रात्री एक ते शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

या घटनेच्या एक दिवस अगोदरच याच मार्गावरील ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील शिवकृपा पेट्रोल पंपावरून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सुमारे दीड हजार लिटर डिझेल चोरीची घटना घडली आहे. महामार्गावरील पंपावर डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, तरटगाव येथील घटनेची मिळालेली माहिती अशी, की या पेट्रोल पंपावर श्रीकांत मल्हारी मोटे (रा. शिंगोली) व मधुकर सोपान मोटे (रा. कामती खुर्द) हे कामगार कामावर होते. डिझेल पंपाचे टाकीमध्ये किती डिझेल आहे हे पाहण्यासाठी तपासणीचे साहित्य (डीपी रॉड) घेऊन ते कामगार टाकीजवळ आले असता डिझेल टाकीला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. वेगळी शंका आल्याने त्यांनी तपासणीचे डीपी रॉड टाकीमध्ये टाकून पाहिले असता सुमारे तीन हजार पाचशे लिटर डिझेल कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पंप व्यवस्थापकांना याबाबतची माहिती दिली. 

या घटनेची फिर्याद गायकवाड यांनी कामती पोलिसांत दिली असून तपास कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बबन माने हे करीत आहेत. सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर दोन दिवसांत एकाच पद्धतीने झालेल्या डिझेल चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT