Two Groups 
सोलापूर

पंढरपुरातील जैनवाडी, भोसे वगळता भालके विरुद्ध परिचारक गटात रंगणार इतर ग्रामपंचायतींचा आखाडा 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील जैनवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच घेतला आहे. त्यानंतर तालुक्‍यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाची असलेली भोसे ग्रामपंचायत देखील बिनविरोध करण्याच्या दृष्टीने स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य ठिकाणी मात्र पारंपरिक भालके विरुद्ध परिचारक गटात निवडणूक होणार आहे. उमेदवारी दाखल केलेल्या अर्जांची आज (ता. 31) छाननी होणार असून 4 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती तहसीलदार विवेक साळुंखे यांनी दिली. 

पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा राजकीय आखाडा चांगलाच तापू लागला आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी 3 हजार 166 उमेदवारांनी 3 हजार 333 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास परवानगी मिळाल्याने अनेक हौशा- नवशांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पंढरपूरच्या तहसील कार्यालयाच्या परिसराला राजकीय जत्रेचे स्वरूप आले होते. 

पंढरपूर तालुक्‍यातील प्रमुख कासेगाव, भाळवणी, भोसे, करकंब, उपरी, सुस्ते, गोपाळपूर, सरकोली, चळे यासह 72 ग्रामपंचायतींच्या 279 प्रभागांतील 776 सदस्यांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक गावांतील उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. दोन दिवसांपासून सर्व्हर डॉउन झाल्याने अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्ज दाखल करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी चार ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीप्रकरणी पेटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड, रक्कम उपचारांसाठी वापरण्याचे आदेश

CJP Protest : दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द; CJP आंदोलनापूर्वी राजधानीत कडक सुरक्षा, प्रवाशांचे हाल!

नाना पाटेकरांच्या मृत्यूची अनैसर्गिक म्हणून नोंद; गोवा पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू, कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार

Maharashtra Live News : राजधानी दिल्लीत उद्या ड्राय डे घोषित

Flipkart BBD Sale मध्ये iPhone अन् Samsung वर बंपर डिस्काउंट; AC ही मिळतोय स्वस्त, पाहा भन्नाट ऑफर्स

SCROLL FOR NEXT