Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीप्रकरणी पेटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड, रक्कम उपचारांसाठी वापरण्याचे आदेश

PETA India Supreme Court : कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीप्रकरणी पेटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका. २५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची आणि ही रक्कम उपचारांसाठी वापरण्याचे आदेश दिल्याची माहिती.
Madhuri Elephant News PETA India Supreme Court

Madhuri Elephant News PETA India Supreme Court

esakal

Updated on: 

Madhuri Elephant Case : नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला पुन्हा जामनगर येथील ‘वनतारा’मध्ये नेऊन तिचे पुनर्वसन करण्याची मागणी करणाऱ्या पेटा इंडिया संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पेटाने दाखल केलेली याचिका फेटाळतानाच न्यायालयाने संस्थेला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंडाची ही रक्कम माधुरीच्या उपचारांसाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत. नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com