Sant Gajanan Maharaj Palkhi Machnoor esakal
सोलापूर

संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात 700 वारकरी, 250 पताकाधारींसह 250 टाळकरी..; माचणूरमध्ये पालखीचं दिमाखात आगमन

विदर्भातील सर्वात मोठी पालखी सोहळा असलेली संत गजानन महाराज यांच्या 'श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा 55 वे वर्ष आहे.

दावल इनामदार

शेगाव येथील मंदिरातून 13 जून रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास 33 दिवसात 700 कि.मी चालत वाटेत लागणाऱ्या नऊ जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे.

ब्रह्मपुरी (सोलापूर) : 'गण गण गणात बोते' व टाळ मृदंगाच्या गजरात आज शनिवारी (ता. 13) सायंकाळी पाच वाजता फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये 'श्रीं'चा मुखवटा विराजमान होताच संत गजानन महाराजांच्या पालखीचे (Sant Gajanan Maharaj Palkhi Machnoor) माचणूर नगरीत आगमन झाले.

भीमा नदी (Bhima River) ओलांडून मंगळवेढा तालुक्याच्या हद्दीत पालखीचे आगमन होताच तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, सोमनाथ अवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सरपंच साधना डोके, ग्रामसेवक गोरख जगताप, संजय शिंदे, डॉ. नंदकुमार शिंदे, भारत पाटील, नितीन पाटील आदींनी पालखीचे स्वागत केले.

विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी विदर्भातील सर्वात मोठी पालखी सोहळा असलेली संत गजानन महाराज यांच्या 'श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा 55 वे वर्ष आहे. संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली. शेगाव येथील मंदिरातून 13 जून रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास 33 दिवसात 700 कि.मी चालत वाटेत लागणाऱ्या नऊ जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे.

पालखी सोहळ्यात अग्रभागी गजानन बँड पथक, दोन अश्वावर स्वार भालदार चोपदार, मध्यात एक अश्व त्या पाठोपाठ भगव्या पताकाधारी वारकरी, त्यामागे शिस्तीत दोन रांगेत शेकडो टाळकरी व भजनी दिंडी नंतर मंगलवाद्य व श्रींचा रजत मुखवटा असणारी पालखी, मेणा, रथ असे स्वरूप होते. संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी, 250 पताका धारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी, दोन रुग्णवाहिका, तीन माल ट्रक, तीन अश्व, एक प्रवासी बस शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते माचणूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत आज भविकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Sant Gajanan Maharaj Palkhi Machnoor

महामार्गलगत असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर रांगोळी व गुलाब पाकळ्यांची पायघड्या करीत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचे या परिसरातील ग्रामस्थांनी अतिशय उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखीचे सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करताच पहाडी आवाजातील जयघोष आणि तितक्याच तन्मयतेने पडणाऱ्या पकवाजावरच्या थापा आणि टाळ्यांच्या कडकडाटात सबंध हा परिसर भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता. मंदिराच्या परिसरात वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था माचणूर येथील सुनील नांदे यांच्याकडून करण्यात आली होती.

आज (ता.13) पालखीचा मुक्काम असून रविवार (ता.14) रोजी सकाळी पालखी मंगळवेढ्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ब्रह्मपुरी येथे सकाळी दामाजी शुगर चे संचालक राजेंद्र पाटील व संजय पाटील यांच्याकडून चहापान व जेवणाच्या व्यवस्था करण्यात आली आहे. शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्धी असलेल्या शेगाव येथील गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविक हरिनामाचा जयघोष करीत पालखी मार्गावर स्वागत करीत असताना भक्त भाराहून जात होते. या परिसरातील बेगमपूर, माचणूर, ब्रह्मपुरी अर्धनारी, तामदर्डी, रहाटेवाडी व बठाण येथील भक्तांनी पालखी मार्गावर दर्शन घेतले. पालखी सोहळा रविवार (ता.14) रोजी मंगळवेढा येथील नगरपालिका शाळेच्या मैदानावर मुक्कामी असणार असून सोमवार (ता. 15) रोजी पालखी सोहळा सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

"40 वर्षापासून आमचे वडील व चुलते यांच्याकडून गजानन महाराज पालखीतील सोहळ्यातील भाविकास नांदे कुटुंबाकडून जेवण व नाश्त्याची परंपरा चालू असून आमच्या कुटुंबास समाधान वाटते व एक आनंद वाटतो, तसेच वर्षभर नांदे कुटुंब सुखी समाधानाने राहत आहे."

-सुनील नांदे, माचणूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT