Ashadhi Wari 2023 sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : पंढरपूर नगरपालिकेची युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम

आषाढी यात्रा कालावधीत अंदाजे १० ते १२ लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाल होते. यात्रा कालावधी पूर्वी व यात्रा कालावधीनंतर भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 - पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहर परिसरात दररोज ६० ते १२० टन कचरा उचलण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, १० वार्ड शिपाई, मुकादम व १५०० सफाई कामगार हे दिवस-रात्र शहर सफाईचे काम करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

आषाढी यात्रा कालावधीत अंदाजे १० ते १२ लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाल होते. यात्रा कालावधी पूर्वी व यात्रा कालावधीनंतर भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

मात्र नगरपरिषद प्रशासनासमोर खरे आवाहन असते ते एकादशी संपल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे! कारण रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यापासून शहरातील नागरिकांना व भाविकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास होत असतो.

याची दखल घेत मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करून आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी, मुकादम, शिपाई व आरोग्य अधिकारी यांना नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दिला होता. त्यानुसार पंढरपूरतील विठ्ठल मंदिर परिसर ,संतपेठ ,स्टेशन रोड , जुनिपेठ, गोविंदपुरा, नविपेठ, इसबावी, मनिषा नगर, गणेश नगर, पालखी मार्ग व पालखी तळ येथील कचरा युद्ध पातळीवर गोळा करण्यात आला.

पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्या सोबत सोलापूर महानगरपालिका, कुर्डूवाडी, बार्शी, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी देखील शहर परिसरातील रस्ते झाडणे, कचरा भरणे, गटारी स्वच्छता, भुयारी गटार स्वच्छता, कचरा वाहतुक, शौचालय स्वच्छता माझी कामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. आषाढी पौर्णिमेपर्यंत ही मोहीम अहोरात्र राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक घरातील कचरा गोळा करण्यासाठी ४१ घंटागाड्यांचा वापर करण्यात येत आहे.

याशिवाय नगरपालिकेच्या २ डंपिंग ट्रॉल्या, २ कॉम्पॅक्टर, १ कंटेनर कॅरीअर अशी ५ वाहने तसेच जिल्ह्यातील अन्य नगर परिषदेचे १० ट्रॅक्टर, जे.सी.बी., टिपर व डंपिंग वाहनांद्वारे द्वारे शहरातील कचरा उचलण्यात येत आहे.

या सफाई मोहिमेमध्ये पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, सर्व सफाई कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT