सोलापूर

...तर `या` शहरातील 30 हजार खुल्या फ्लॅटचा होणार लिलाव 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील खुल्या प्लॉटच्या तब्बल 30 हजार थकबाकीदार मिळकतदारांची नावे आज  शनिवारपासून वर्तमानपत्रात टप्याटप्प्याने प्रसिद्ध केली जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही तर खुल्या मिळकतीवर बोजा चढवून त्यांचा लिलाव केला जाणार आहे.

दरम्यान यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी आयुक्त दीपक तावरे यांनी आढावा बैठक घेतली. सहायक आयुक्त एस. बी. पवार, मुख्य लेखापाल तथा नियंत्रण अधिकारी शिरीष धनवे, कर संकलन अधिकारी प्रदीप थडसरे, प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. शहर विभागात 4 हजार 471 आणि हद्दवाढ भागात 25 हजार 814 खुल्या जागा आहेत. त्या मिळकतींची थकबाकी दहा हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहे. अशा सर्व मिळकतींची यादी तयार करून थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास संबंधित मिळकतींचा लिलाव करण्यात येऊन, त्यांची विक्री केली जाणार आहे. 

शहरातील विविध वर्तमानपत्रात थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. संबंधित मिळकतदारांनी थकबाकी भरून सवलतीचा लाभ घ्यावा. शास्तीवर 75 टक्के सवलत योजना 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदाराला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन संबंधितांनी आपल्या मिळकतीवर बोजा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. मुदतीत थकबाकी न भरल्यास या मिळकतींवर बोजा चढविण्यात येईल, त्यानंतर त्या जप्त करण्यात येऊन त्यांचा लिलाव केला जाईल, असेही श्री. तावरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT