Authorities took refuge in the cane to escape the beating 
सोलापूर

मारहाणीतून सुटका करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी घेतला उसाचा आश्रय

उमेश महाजन

महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) : नीरा उजवा कालव्यावरील अनधिकृत पाणी चोरी करणाऱ्यांनी सायपन काढण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सायपन काढण्यास विरोध करत काहींनी शिवीगाळ करून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार सांगोला तालुक्‍यातील महूद अंतर्गत असणाऱ्या वितरिका क्रमांक 69 जवळ सोमवारी (ता. 27) रात्री नऊ वाजता घडला. याबाबत सांगोला पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
महूद पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अभिजित म्हेत्रे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नागेंद्र ताटी, आनंद लेंडवे यांच्यासह खासगी कामगार रसिकांत भोसले, सोमनाथ भोसले हे सर्वजण सोमवारी (ता. 27) नीरा उजवा कालव्यावरील पाणी चोरी करणारे अनधिकृत सायपन काढण्यासाठी जेसीबी घेऊन गेले होते. अनधिकृत सायपन काढत ते वितरिका क्रमांक 69 जवळ पोचले असता त्याठिकाणी महूद येथील सोमनाथ तानाजी जाधव, सुनील रामचंद्र नागणे, समाधान शिवाजी जाधव, योगेश ऊर्फ विठ्ठल सतीश जाधव, महेश शिवाजी चव्हाण, धनाजी तानाजी काटे, सूरज मागाडे व आणखी एक अनोळखी व्यक्ती असे सर्वजण चार दुचाकीवरून तेथे पोचले. त्यातील योगेश जाधवने जेसीबी चालक किसन येडगे यास सायपन काढण्यास विरोध केला. त्या वेळी अभिजित मेहेत्रे यांनी अनधिकृत सायपन काढण्याचे सरकारी काम असून या कामात अडथळा आणू नका असे सांगितले असता, सोमनाथ जाधव याने त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिव्या दिल्या. तसेच मारहाण केली. त्याचवेळी इतर सर्वांनी शिवीगाळ करत अभिजित म्हेत्रे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नागेंद्र ताटी, रसिकांत भोसले, सोमनाथ भोसले यांनी त्यांना या लोकांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. शिवाय सायपन काढण्यासाठी आणलेला जेसीबीवर (एमएच 10-बीजी 210) दगडफेक करून त्याचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. मारहाण करणाऱ्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी अधिकाऱ्यांना उसाच्या शेतात पळून जावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT