logo 
सोलापूर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचा जागरण गोंधळ 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे व नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. जागरण गोंधळ आंदोलना सोबतच संघटनेच्यावतीने एक दिवसाचे धरणे आंदोलनही करण्यात आले. 

रयत क्रांती संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. रयत क्रांती संघटनेचा नारा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या सह इतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता.

जिरायत भागातील नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपये व बागायत, फळबागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, पुरामुळे नदीकाठच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ ४०० धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

Latest Marathi News Live Update : तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या

SCROLL FOR NEXT