Ba Raigad family
Ba Raigad family sakal
सोलापूर

Mangalwedha News : किल्ले संवर्धनासाठी झटणारा बा रायगड परिवार

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - ऐतिहासिक किल्ले संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे या किल्ल्याचे संवर्धन व्हावे, व पुढच्या पिढीला ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मिळावी या दृष्टिकोनातून पुणे येथील बा रायगड हा परिवार किल्ले संवर्धनासाठी गेली आठ वर्षापासून प्रयत्न करीत आहे.

छत्रपती शिवरायांचा इतिहास संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरला असतानाच या ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेली ठिकाणे व किल्ले सध्या पडझळीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संघटना किल्ले संवर्धनासाठी पुढे येत आहेत.

जेणेकरून या संवर्धनामधून किल्ल्याचे अस्तित्व किल्ल्याच्या खुणा पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी असव्यात या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. अशीच एक सामाजिक संघटना पुणे जिल्ह्यातील बा रायगड ही संघटना गेली. आठ वर्षापासून किल्ले संवर्धनासाठी सातारा, पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या विभागातून प्रयत्न करीत आहे.

दर महिन्यातील एका रविवारी या संघटनेच्या माध्यमातून सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत हे अभियान राबवले जाते दुपारचे जेवण त्याच गडावरच करून या मोहिमेचा समारोप केला जातो त्यामध्ये सांगली विभागातील सदस्यानी कवठे महांकाळ जवळील जुना पन्हाळा, बहादूरवाडीची गढी,कुळदुर्ग किल्ला, शिवाजी महाराजांचे गुप्तचर असलेले बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाच्या संवर्धनासाठी त्यांनी अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत.

त्यामध्ये किल्ल्यावरील स्वच्छता, पडझड झालेली ठिकाणे,दिशा दर्शक फलक व माहिती फलक लावणे,स्थळ दर्शक नकाशा लावणे,गडावरील पाण्याची टाकी व तलाव स्वच्छ करणे, त्या ठिकाणी वृक्षरोपण व बंद झालेल्या वाटा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कुळदूर्ग किल्ल्यावर संवर्धन करीत असताना 1138 मधील चालुक्य राजा जगदेकमल यांचा शिलालेख सापडला त्यावरील मजकूर सांगली येथील इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांच्याकडून वाचून घेतला असता त्यातून जुन्या इतिहासकालीन गोष्टीचा बोध झाला.

नव्या पिढीला किल्ल्यावर किल्ल्याच्या रूपातून माहिती होणारा इतिहास व्यवस्थित रहावा स्वच्छता व बांधकाम व्यवस्थित राहावे या दृष्टीकोनातून आम्ही गेली सहा वर्षे संवर्धनाची काम करीत आहे यातून आम्हाला प्रेरणा मिळते व ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन होते.

- राजेश जाधव, विभाग प्रमुख सांगली विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT