Rajendra Raut,Dilip Sopal sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : महायुती, महाविकास आघाडीतच ‘काँटे की टक्कर’

Barshi Vidhan Sabha Election 2024 : महायुतीकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी ऐनवेळी धनुष्यबाण चिन्ह घेऊन तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री दिलीप सोपल हे मशाल चिन्ह घेऊन परंपरागत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विद्यमान आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजीमंत्री दिलीप सोपल यांच्यात सामना

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यात एकास एक अशी एकमेव लढत बार्शी विधानसभा मतदार संघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी होत आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी ऐनवेळी धनुष्यबाण चिन्ह घेऊन तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री दिलीप सोपल हे मशाल चिन्ह घेऊन परंपरागत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

१९९९ पासून २०२४ पर्यंत राऊत आणि सोपल यांच्यातच लढत होत असून यावेळीही काट्याची लढाई पहायला मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या सभांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघ एकसंध असा १३८ गावांचा असून लोकसभा निवडणुकीनंतर विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांची उमेदवारी निश्चित होती. लोकसभेला खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सोपल यांनी केलेला प्रचार अन् महाविकास आघाडीला मिळालेल्या लीडमुळे मतदार संघातील वातावरण अनपेक्षितरित्या बदल्याचे दिसले.

विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका अखेरच्या टप्प्यात असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची राळ सुरू असून महायुती किंवा महाविकास आघाडीला मतदार निवडणार याचा अंदाज अद्यापही कोणासही सांगता येत नाही.

विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी पाच वर्षांत केलेली विकासकामे, शहरासह तालुक्यात असलेला जनसंपर्क, प्रचारामध्ये कुटुंबातील विजय राऊत, रणवीर राऊत, रणजित राऊत, अभिजित राऊत, कविता राऊत, शुभांगी राऊत, कोमल राऊत, अंकिता राऊत, मृणाल राऊत, पूजा राऊत यांनी शहरासह तालुक्यात पदयात्रा काढून घरोघरी जाऊन प्रचाराचा धुमधडाका केला आहे.

तालुक्यातील नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती अशी सत्ता केंद्रे आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात असल्यामुळे निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवणे उपयुक्त ठरले ही त्यांची जमेची बाजू आहे.

माजीमंत्री दिलीप सोपल नवव्यावेळी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. प्रचंड अनुभव पाठिशी असून मतदारसंघातील नागरिकांशी व्यक्तीगत संपर्क आहे. लोकसभेला तालुक्यातून मिळालेला लीड, महाविकास आघाडीकडून पहिल्या यादीत मिळालेली उमेदवारी त्यामुळे प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला.

विश्वास बारबोले, निरंजन भूमकर, युवराज काटे यांची मिळालेली साथ या जमेच्या बाजू असून कुटुंबातील उज्वला सोपल, योगेश सोपल, आर्यन सोपल यांनी शहर अन् तालुक्यात प्रचारसभा, पदयात्रा घेऊन प्रचाराचा धुरळा उडवला आहे. खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी सभेमध्ये केंद्र, राज्य सरकारवर टीका करून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबोले, अॅड. विकास जाधव, मकरंद निंबाळकर, नंदकुमार काशीद, मयूर डोईफोडे यांनी प्रचारसभेत तसेच सोशल मीडियावर प्रभावी प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

निवडणुकीत गाजलेले मुद्दे

  • वैराग तालुका निर्मिती प्रश्न प्रलंबित.

  • श्री भगवंत तीर्थक्षेत्र निधी.

  • गुंडगिरी,दहशत, गद्दारी मुद्यांवर महाविकास आघाडीचा भर.

  • पाच वर्षात चार हजार कोटीची विकासकामे केल्याचा महायुतीकडून प्रचार.

  • उपसासिंचन योजना,पाणीपुरवठा याकडे वेधले मतदारांचे लक्ष.

  • संतनाथ साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन.

  • मोठे उद्योग नसल्याने बेरोजगार तरुणांना हाताला काम नाही.

  • मतदारसंघात ९ हजार ८७१ नवमतदारांची नोंदणी कोणाच्या पारड्यात जाणार?

  • मनोज जरांगे-पाटील यांच्या फॅक्टरचा फायदा कोणास होणार?

    #ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT