Maharashtra Politics Esakal
सोलापूर

Maharashtra Politics: 'भालकेंनी पवारांचा विश्वासघात केला; त्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल'

भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारीही दिली होती

सकाळ डिजिटल टीम

आमदार भारत भालके हे आजारी असताना देशाचे नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन नानांना धीर दिला होता. त्यांच्या निधनानंतरही भालके कुटुंबाकडे लक्ष दिले. त्यापुढे जाऊन पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारीही दिली. इतकं सगळं करूनही राष्ट्रवादी व शरद पवार यांना दोषी धरून ‘बीआरएस’ची वाट धरण्याचा प्रकार म्हणजे शरद पवार यांचा विश्वासघात आहे, असा आरोप ‘विठ्ठल’चे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना श्री. पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या हैदराबाद भेटीवर भाष्य केले.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी एकमेकांच्या विरोधात बोलणारे, लढणारे भगीरथ भालके, युवराज पाटील, कल्याणराव काळे, गणेश पाटील हे सगळे कारखाना निवडणुकीत एकत्रित आले आहेत.(Latest Marathi News)

‘विठ्ठल’च्या वेळी थकीत ऊस बिलावरून भगीरथ भालकेंवर टीका करणारे युवराज पाटील आज ‘सहकार शिरोमणी’च्या थकीत ऊस बिलावर मूग गिळून गप्प आहेत. राजकारणात वारसा चालत नाही, अशी युवराज पाटलांवर टीका करणारे कल्याणराव काळे त्यावर काही बोलत नाहीत. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी हे एकत्रित आले आहेत. हीच गोष्ट सभासदांच्या लक्षात आली आहे. अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांच्या पाठीशी सभासद ठामपणे उभा आहे.(Latest Marathi News)

कर्तृत्वशून्य असलेल्या भगीरथ भालकेंना लोकांनी जिल्हा परिषद निवडणुकीत चारीमुंड्या चित केले. विधानसभेला नाकारले. विठ्ठलच्या निवडणुकीत तर थेट घरी पाठवले; तरीही आरपारची भाषा केली जाते. शरद पवारांच्या आशीर्वादामुळे तीन वेळा आमदारकी मिळाली, याचा विसर त्यांना पडला आहे.

जनता याचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वार्थापोटी नेत्यावरील निष्ठा आणि पक्ष बदलू पाहणाऱ्या भगीरथ भालकेंना याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला आहे. यावेळी डॉ. बी. पी. रोंगे, अॅड. दीपक पवार आदी उपस्थित होते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT