LEOPARD 
सोलापूर

बापरे ! भिलारवाडीत बिबट्या? पाडला वासराचा फडशा; चार दिवसांतील दुसरी घटना

संतोष केसकर

जिंती (सोलापूर) : भिलारवाडी (ता. करमाळा) शिवारात बिबट्यासदृश प्राण्याची दहशद वाढली आहे. वाल्मीक ज्ञानदेव काटे यांच्या एका वासराचा आज (बुधवारी) पहाटे बिबट्यासदृश प्राण्याने फडशा पाडला असून, एका गाईला जखमी केले आहे. या घटनेमुळे भिलारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, भिलारवाडी ग्रामपंचायतीने या प्राण्याला पकडण्यासाठी ठराव घेतला आहे. हा ठराव वनविभागाला पाठवला आहे. 

भिलारवाडी परिसरात 29 नोव्हेंबर रोजी बाळू माने यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्यासदृश प्राण्याने जखमी केले होते. आज पहाटे पुन्हा त्याच शिवारात या प्राण्याने पुन्हा वाल्मीक काटे यांच्या वासरावर हल्ला करून वासराचा फडशा पाडला आहे तर गाईला जखमी केले आहे. 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कात्रज, टाकळी, रामवाडी या परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळला होता. विठ्ठलवाडी (ता. करमाळा) शिवारात संतोष वारगड यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्यासदृश प्राण्याने खाल्ली होती. त्यानंतर या बिबट्याने भिलारवाडी परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरवात केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

या घटनेविषयी वाल्मीक काटे यांनी सांगितले, की मी काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये गेलो होतो. त्या वेळी मला शेतात एक बिबट्या व दोन लहान पिल्लं दिसली होती. ही माहिती मी ग्रामस्थांना सांगितली होती. त्यानंतर रात्री बिबट्याने मध्यरात्री आमचे वासरू खाल्ले आहे. वनविभागाने या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. 

भिलारवाडीचे सरपंच भरत गिरंजे म्हणाले, भिलारवाडीत बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यामुळे गाव भयभीत झाले आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा यासाठी ग्रामपंचायतीने आज ठराव घेतला आहे. 

वनविभागाने घेतले झोपेचे सोंग 
पश्‍चिम भागात बिबट्यासदृश प्राण्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरू केले आहेत. परंतु वनविभागाने भेटी देण्याशिवाय कसलीही कार्यवाही केली नाही. वन विभागाबद्दल नागरिकांमध्ये रोष वाढत चालला आहे. 

मोहोळचे वनपाल ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याशी संपर्क करून या घटनेविषयी माहिती दिली असता, कर्मचाऱ्यांना घटनास्थळास भेट देण्यास सांगतो, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Heavy Vehicle Ban : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

SCROLL FOR NEXT