भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी (ता. 29 जून) तब्बल 62 जणांनी 65 उमेदवारी अर्ज दाखल केले.
मोहोळ - टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी (ता. 29 जून) तब्बल 62 जणांनी 65 उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यामध्ये भीमा परिवार व भीमा बचाव संघर्ष समितीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकुण 15 जागेसाठी ही निवडणुक होत असुन उद्या गुरुवार ता. 30 जुन रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकी साठी 31जुलै रोजी मतदान होणार आहे.
गट निहाय भरलेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे -
ऊस उत्पादक मतदार संघ पुळुज गट - बिभिषण बाबा वाघ, चंद्रकांत दादा शिंदे, लिंगदेव रावसाहेब देशमुख, प्रभाकर सिद्राम गावडे
टाकळी सिकंदर गट - बापूसाहेब नारायण चव्हाण, दत्तात्रय तात्या सावंत, बाबुराव नाशिकेत शिंदे, संभाजी नामदेव कोकाटे, बबन दत्तू बेदरे, राजाराम दगडू माने, शिवाजी संदिपान भोसले, विक्रम प्रल्हाद डोंगरे, हिम्मतराव प्रतापराव पाटील, राजेंद्र केराप्पा चव्हाण
सुस्ते गट - पंकज मच्छिंद्र नायकुडे, रामहरी अनंत रणदिवे, संतोष चंद्रकांत सावंत, केशरबाई मल्लिकार्जुन देठे, महादेवराव अगतराव माने, तात्यासाहेब ज्ञानोबा नागटिळक, शरद विलास लोकरे, यशवंत मोहन चव्हाण, तानाजी बाबुराव पाटील, समाधान ज्ञानोबा जगताप, वर्षा तुषार चव्हाण, अंकुश सुबराव लामकाने
अंकोली गट - बाबासाहेब सौदागर जाधव, तुकाराम दत्तात्रय पाटील, सज्जनराव साहेबराव पवार, सतीश नरसिंह जगताप
कोन्हेरी गट - भारत गोविंद पवार, दत्तात्रय विठोबा कदम, राजकुमार भास्कर पाटील, हर्षद शहाजी दळवे, ज्योतीराम औदुंबर घागरे, भीमराव संभाजी मुळे, रावसाहेब प्रल्हाद काकडे, धोंडीबा गणू उन्हाळे, राजाराम आत्माराम पाटील
अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी - तानाजी दाजी सावंत, तानाजी सिताराम सुतकर, भारत सुदाम सुतकर, विनायक रायप्पा सरवदे, सुहास कुमार आवारे
महिला राखीव प्रतिनिधी - प्रतिभा बाबुराव शिंदे, केशरबाई मल्लिकार्जुन देठे, छाया दिलीप डोंगरे, सुहासिनी शिवाजी चव्हाण, भावना तानाजी शिवशेट्टी, उज्वला भाऊराव वसेकर, जयश्री हिंमत पाटील, विमल अंकुश लामकाने.
इतर मागासवर्ग प्रतिनिधी गट - शंकर गंगाधर माळी, नागनाथ भीमराव मोहिते, बब्रुवान सावळा माळी, विक्रम अनिल गवळी, राजकुमार कुंडलिक भंडारे, पांडुरंग कुंडलिक वसेकर,प्रभाकर बळीराम गवळी तर भटक्या विमुक्त जाती /जमाती
विशेष मागास प्रवर्ग - दिगंबर आगतराव खांडेकर, दिलीप नामदेव काळे व राजू विठ्ठल गावडे अशा एकूण 65 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.