bhima sugar factory sakal
सोलापूर

'अखेर भिमा ची निवडणुक लागली'

खा. धनंजय महाडिक यांची बिनविरोधाचे आवाहन धुडकावत अखेर टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली.

राजकुमार शहा

खा. धनंजय महाडिक यांची बिनविरोधाचे आवाहन धुडकावत अखेर टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली.

मोहोळ - खा. धनंजय महाडिक यांची बिनविरोधाचे आवाहन धुडकावत अखेर टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकी साठी येत्या 13 तारखेला मतदान होणार असून 14 तारखेला मतमोजणी होणार आहे.

सकारात्मकता दाखवीत खा महाडिक यांनी निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन विरोधकांना केले होते. मात्र विरोधकांनी ते अमान्य करीत निवडणूक प्रक्रिया सुरू केली. खा महाडिक यांनी या निवडणुकीत सहा चेहरे नवीन दिले आहेत, उर्वरित जुने आहेत. त्यामुळे जुन्या नव्यांचा बऱ्यापैकी मेळ घातला आहे.

या निवडणुकीत खा महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक हे पुळुज गटातून उभे आहेत तर त्यांच्या विरोधात भीमा बचाव चे कारखान्याचे उपाध्यक्ष राहिलेले कल्याणराव पाटील उभे आहेत. कारखान्याचे सध्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपाचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण हे टाकळी सिकंदर गटातून उभे आहेत संस्था प्रतिनिधी गटातून खा धनंजय महाडिक हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात भिमा बचाव चे राजेंद्र आदिनाथ चव्हाण उभा आहेत.

सर्वांचे लक्ष असलेल्या कोन्हेरी गटातून सध्याचे संचालक राजेंद्र टेकळे यांना भीमा विकास आघाडीने पुन्हा संधी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष कुमार गोडसे उभा आहेत. भीमा बचाव आघाडी कडून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या पत्नी अर्चना घाडगे यांना संधी देण्यात आली आहे तर त्याच गटातून भीमा विकास आघाडीतून सिंधू चंद्रसेन जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांनी गेल्या आठवड्या पासून होम टू होम जाऊन सर्व वातावरण ढवळून काढले आहे. या निवडणुकीत काय होणार हे येत्या 14 तारखेलाच समजणार आहे.

भीमा शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे -

पुळूज गट -

विश्वराज धनंजय महाडिक, बिबीशन बाबा वाघ

टाकळी सिकंदर गट -

सुनील रावसाहेब चव्हाण, संभाजी नामदेव कोकाटे

सुस्ते गट -

संतोष चंद्रकांत सावंत, तात्यासाहेब चंद्रकांत नागटिळक

अंकोली गट -

सतीश नरसिंग जगताप, गणपत महादेव पुदे

कोन्हेरी गट -

राजेंद्र गोरख टेकळे

महिला राखीव गट -

सिंधू चंद्रसेन जाधव, प्रतीक्षा बाबुराव शिंदे

इतर मागासवर्गीय गट -

अनिल आगतराव गवळी

भटक्या विमुक्त जाती जमाती गट -

सिद्राम ज्ञानोबा मदने

अनुसूचित जाती जमाती गट -

बाळासाहेब बापू गवळी

संस्था प्रतिनिधी गट -

खा. धनंजय भीमराव महाडिक

भिमा बचाव परिवर्तन आघाडी यांचे उमेदवार पुढील प्रमाणे -

पुळुज गट -

कल्याणराव आप्पाराव पाटील, देवानंद रावसाहेब गुंड

टाकळी सिकंदर गट -

राजाराम दगडू माने शिवाजी संदिपान भोसले

सुस्ते गट -

पंकज मच्छिंद्र नायगुडे, विठ्ठल दत्तात्रेय रणदिवे

अंकोली गट -

भारत गोविंद पवार रघुनाथ नेमिनाथ सुरवसे

कोन्हेरी गट -

कुमार महादेव गोडसे

महिला राखीव गट -

सुहासिनी शिवाजी चव्हाण, अर्चना दिलीप घाडगे

अनुसूचित जाती जमाती गट -

भारत सुदाम सुतकर

इतर मागास प्रवर्ग -

राजाभाऊ कुंडलिक भंडारे

भटक्या विमुक्त जाती जमाती गट -

राजू विठ्ठल गावडे

संस्था गट -

राजेंद्र आदिनाथ चव्हाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT