BJP district president Shrikant Deshmukh has accused Chief Minister Uddhav Thackeray of locking up Pandurang of Pandharpur.jpg
BJP district president Shrikant Deshmukh has accused Chief Minister Uddhav Thackeray of locking up Pandurang of Pandharpur.jpg 
सोलापूर

मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरचा पांडुरंग देखील कोंडून ठेवला

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मंदिरे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवली आहेत. सरकारने अनलॉक जाहीर केल्यानंतर दारुची आणि बिअरची दुकाने उघडली आहेत. परंतु मंदिर बंद ठेवली आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूरचा पांडुरंग देखील कोंडून ठेवला आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.
 
राज्यातील मंदिर दर्शनासाठी खुली करावीत या मागणीसाठी राज्यभरातातील विविध मंदिरांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पंढरपुरातही विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, यामागणीसाठी भाजपच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला.
 
श्री.देशमुख म्हणाले की, पंढरपूर ही भारताची दक्षिण काशी आहे. परमात्मा पांडुरंगाचे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक जाहीर केल्यानंतर अनेक अस्थापने, दुकानांसह दारुची आणि बिअरची दुकारने उघडण्यास परवानगी दिली आहे. याबरोबरच सार्वजनिक वाहतूक देखील सुरु केली आहे. मात्र मंदिरे का बंद ठेवली आहेत, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगासह राज्यातील देव कोंडून ठेवले आहेत. सरकारच्या ताब्यातून देवांना मुक्त करण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. 

आंदोलक कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ भजन करत सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करत मंदिरे खुली करण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, शहर प्रसिध्दी प्रमुख शंतून दंडवते, महिला आघाडीच्या अध्यक्षा शंकुतला नडगिरे, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, प्रणव परिचारक, माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर, अपर्णा तारके, वैशाली चंकेश्वरा, आनंद फाटे, विदुल आधटराव, कवडे महाराज, हणमंत पाटील, अनिल अभंगराव आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

जिल्हा अध्यक्ष देशमुख आणि पोलिसांमध्ये शाब्दीक बाचाबाची 

विठ्ठल मंदिर खुले करावे यामागणीसाठी जिल्हा भाजपने संत नामदेव पायरी जवळ मंगळवारी (ता.13) सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सकाळ पासूनच भाजप कार्यकर्ते संत नामदेव पायरी जवळ जमा झाले होते. दरम्यान सुरक्षतेच्या कारणावरुन पोलिसांनी संत नामदेव पायरी जवळ आंदोलन करता येणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पोलिसांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलन येथे करणार, आम्हाला अटक करायची तर करा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे, असे सांगत आक्रमक भूमिका घेतली. 

यावेळी पोलिस आणि त्यांच्यामध्ये बराचवेळ शाब्दीक बाचाबाची देखील झाली
 
शेवटी उपविभागीय पोलिस अधिकरी विक्रम कदम यांनी सामोपचाराची भूमिका घेत, श्री.देशमुखांना संत नामदेव पायरी जवळ आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात भजन करत आंदोलन केले. श्री. देशमुख आणि पोलिसांमध्ये झालेल्या शाब्दीक बाचाबाचीमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT