Markndeya Hospital 
सोलापूर

ऑक्‍सिजन सिलिंडर स्फोटादरम्यान दोघांचा मृत्यू ! मार्कंडेय रुग्णालयाने फेटाळला नातेवाइकांचा आरोप

विश्वभूषण लिमये

सोलापूर : भद्रावती पेठ येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयामध्ये काल बुधवारी रात्री ऑक्‍सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा स्फोट झाला त्या दरम्यान हनुमंत क्षीरसागर या रुग्णाला भेटायला आलेल्या नातेवाइकाचा स्फोटाच्या धक्‍क्‍यामुळे मृत्यू झाला. याबाबत मृत व्यक्तीच्या मृत्यूस सर्वस्वी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मृत हनुमंत क्षीरसागर यांच्या नातेवाइकांनी केला आहे. 

तसेच सुनील लुंगारे या रुग्णाचा सुद्धा काल मृत्यू झाला आहे. मात्र कालच्या घटनेचा आणि सुनील लुंगारे यांच्या मृत्यूचा कुठलाही संबंध नसल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. रुग्णालयामध्ये सुनील लुगारे या रुग्णाला आणले त्या वेळी रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र तरी, भंडारा गॅस सिलिंडर दुर्घटनेतून हॉस्पिटल प्रशासनाने अद्याप धडा घेतला की नाही, असा प्रश्न उभा ठाकला आहे. 

या एकूणच घटनेबाबत मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले, की मागच्या आठवड्यात आम्ही नवीन ऑक्‍सिजन टॅंक घेतले आहे आणि त्याच टॅंकमधून आम्ही ऑक्‍सिजन घेतो. जुन्या ऑक्‍सिजन टॅंकमध्ये जो स्फोटा झाला त्यामुळे त्यातून पावडर बाहेर पडली व ती सर्वत्र पसरली. त्या वेळी आम्ही आयसीयूमधून पेशंटना बाहेर काढले. तेव्हा लक्षात आले, की हनुमंत क्षीरसागर हा येथे ऍडमिट रुग्णाचा नातेवाईक तेथे थांबलेला होता. त्या वेळी तो बेशुद्ध दिसला. स्फोटाच्या आवाजामुळे बेशुद्ध झाला असेल की कशामुळे ते माहीत नाही. आमच्या लोकांनी त्याला लगेच आयसीयूमध्ये शिफ्ट केले. त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो रुग्ण जो आमच्याकडे ऍडमिट नव्हता मात्र रुग्णाला भेटायला आला होता, तो मरण पावला. याबाबत आम्ही पोलिसांना त्वरित कळवलं व एमएलसी केलेली आहे. 

डॉ. गुर्रम म्हणाले, दुसरा रुग्ण सुनील लुंगारे हा पोस्ट कोव्हिड होता. त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार केल्यानंतरही त्याची गंभीर परिस्थिती होती. तो काल मरण पावला. या दोन घटना काल घडल्या मात्र त्याचा संबंध ऑक्‍सिजन सिलिंडर स्फोटाशी नाही. दुसरा हनुमंत क्षीरसागर ही व्यक्ती जी रुग्णाला पाहण्यासाठी आलेली होती, मात्र आमच्या रुग्णालयात ऍडमिट नव्हती तिच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टेम नंतर समजून येईल. 

दरम्यान, हनुमंत क्षीरसागर यांच्या नातेवाइकांनी हनुमंत यांचा मृत्यू सिलिंडरच्या स्फोटामुळेच झाल्याचा आरोप केला असून, संपूर्ण नुकसानभरपाई रुग्णालया प्रशासनाने द्यायला हवी, अशी मागणी करत त्यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT